Home | दिल से

दिल से

image

झोपडपट्टीतील मुलांना संगणक प्रशिक्षण

संगणक प्रशिक्षण केंद्रात एक-दीड महिना विद्यार्थीच फिरकत नव्हते. शेवटी आम्ही पालकांना समजावले. त्यामुळे येथे विद्यार्थीसंख्या वाढू लागली. त्यानंतर अचानक महापालिकेच्या मुंबई मलनि:सारण प्रकल्प विभागाने या प्रशिक्षण केंद्राला आक्षेप घेतला. त्यामुळे वर्षभरातच आमच्या संगणक प्रशिक्षण केंद्राला टाळे लागल़े...
Full story
image

परिवर्तन हा जीवनाचा नियम

मानवाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. तशीच आरोग्याची महत्त्वाची गरज आहे शौचालय! तेही स्वच्छ! समाजाची हीच गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने संस्थेची धर्मादाय कार्यालयात नोंदणी झाली आणि संस्थेची ती बांधीलकी झाली़. ...
Full story
image

विसर्जनातील पाप-पुण्य

सामाजिक कार्य करताना विरोध, अपमान, हिरमोड समाधान या गोष्टी नेमाने येतात. त्याचा ‘दिल से’ वापर कसा करून घ्यावयाचा हे प्रत्येक कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं...
Full story
image

स्वच्छतेचं महत्त्व

‘माझ्या संस्थेने समाजात केलेलं समाजसेवेचं काम समजून घेऊन जर समाजात बदल घडवण्यास काही तरुण तयार झाले तर ते समाजाचं भाग्यच असेल़’ म्हणून संस्थेच्या कार्याबाबत लिहायचं असं मी ठरवलं...
Full story
image

जायते यस्मिन लियते इति जल

‘माळिया जेकते नेलं ते निवांतची गेलं’अशी पाण्याची शरणागती उपमा ज्ञानदेवांनी दिली आहे. म्हणूनच पाण्याचा आदर्श मानवाने धरावा. कृतज्ञतेने त्याची आठवण ठेवावी. ज्ञानदेव महाराज पुढे म्हणतात, ‘म्हणोनी जाणतेने गुरू भजिजे तेणे कृतकार्या होईजे. जैसे मूळ सिंचते साहिजे, शाखा पल्लव संतोषिती..’ अर्थात, शहाण्याने गुरू करावा आणि गरूच्या मार्गदर्शनाने आपले जीवन कृतार्थ करावे. जसे मुळांना पाणी दिल्यास फांद्यांना ते संतुष्ट करते....
Full story
image

निसर्ग सर्वांची हाव पुरवू शकत नाही!

निसर्ग सर्वाची गरज भागवू शकतो, पण सर्वांची हाव पुरवू शकत नाही. हे महात्मा गांधी यांचे सुभाषित निसर्गाला ओरबाडून ऐष करायला निघालेल्या आधुनिक माणसाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेच, पण त्याही पलीकडे निसर्ग आणि मानवसंबंधांचा गांभीर्याने विचार करणा-या सर्वाच्या विचारांना योग्य दिशा देणारे आहे. यंदाचे 2010 हे वर्ष आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. ...
Full story
image

निसर्गरम्य लोणार सरोवर

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे जगातील एकमेव खारे पाणी असलेले सरोवर आहे. जगातील गोलाकार आकार असलेल्या 198 सरोवरांमध्ये आकारमानाच्या दृष्टीने त्याचा तिसरा क्रमांक लागतो. लोणार सरोवराच्या निर्मिती बाबत दोन वैज्ञानिक विचार प्रवाह आहेत. ...
Full story
image

थेंब थेंब साठवला पाहिजे!

भारतात वर्षाच्या विशिष्ट काळात पाऊस पडतो. भारतातील व महाराष्ट्रातील सध्याची धरणांची क्षमता जेमतेम वर्षभर पाणी साठवण्याइतकीच आहे. या धरणांमध्ये जास्तीत जास्त पाणी कसं जमा हाईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नवीन धरणे त्या प्रमाणात मोठय़ा साठय़ांची बांधावी लागतील. पर्यावरणाच्या नावाखाली धरण प्रकल्पाला विरोध करणे धोक्याचे आहे. ...
Full story
image

एका तळ्यात...

वाढत्या शहरीकरणामुळे व चुकीच्या पद्धतीने केलेल्या विकासकामांमुळे बहुतांश तलाव प्रदूषित झाले आहेत. या प्रदूषणामुळे जैवविविधतेचा -हास झालेला दिसून येतो. ...
Full story
image

डोळस करणारे अनुभव

वस्तीत काम करताना काही महिला भेटल्या. त्यापैकी वस्तीत राहणा-या द्रौपदी व शुभद्रा ‘अपनालय’च्या आता प्रशिक्षित कार्यकर्त्यां आहेत. द्रौपदीनं आपल्या मुलींना प्रतिकूल परिस्थितीत वाढवलं. उच्चशिक्षण दिलं. एकीनं निर्मला निकेतनमधून समाजसेवेची पदवी घेतली तर दुसरीनं एम. ए. केलं. मुलींची शिक्षणाची आवड पाहून अपनालयाने द्रौपदीला आर्थिक मदत देऊ केली. पण तिनं ती नाकारली. माझ्यापेक्षा अधिक गरजू असलेल्यांना ही रक्कम द्या, असं तिनं सांगितलं. सुभद्रानंही प्रतिकूल परिस्थितीत मुलींना शिकवलं. ...
Full story