दिनविशेष, ०५ जुलै
१८१८ - जर्मनी येथील बुद्धिबळ या खेळाचा विश्वविजेता अॅडॉल्फ अँडरसन याचा जन्म.
१८३७ - थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक, समाजसुधारक रामकृष्ण गोपाल भांडारकर यांचा जन्म. प्राचीन भारतातील विविध धार्मिक संप्रदायांच्या व तत्त्वज्ञानाचा संगतवार इतिहास त्यांनी लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथात आहे.
१८६२ - देशातील मानवशास्त्राच्या अभ्यासाचे अग्रदूत अनंतकृष्ण अय्यर यांचा जन्म.
१९२१ मध्ये देशात प्रथम कलकत्ता विद्यापीठात मानववंशशास्त्र विभाग उघडण्यात आला. त्या विभागाचे पहिले प्राध्यापक होण्याचा मान त्यांना मिळाला. कर्नाटक, केरळमधील जाती-जमातीवरील त्यांचे ग्रंथ आजही प्रमाणभूत मानले जातात.
१८८१ - विदर्भातील एक सत्पुरुष गुलाबराव महाराज यांचा जन्म. त्यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इ. अनेक विषयांवर लेखन केले. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांतून व व-हाडी बोलीतून त्यांनी सुमारे १२५ ग्रंथ लिहिले.
१९२० - नामवंत भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शैलीकार लेखक, प्रा. विनायक महादेव दांडेकर यांचा जन्म. डॉ. नीलकंठ रथ यांच्यासह त्यांनी लिहिलेल्या भारतातील दारिद्रय़ या ग्रंथामुळे ते अतिशय गाजले होते.
१९२७ - श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचा जन्म. त्यांनी कादंबरी, चित्रपट, कथा, नाटक अशा विविध अंगातून साहित्य स्पर्श केलेला आहे.
१९३० - दाक्षिणात्य संगीतातील प्रसिद्ध गायक व व्हायोलिनवादक डॉ. बालमुरलीकृष्णन यांचा जन्म. भारत सरकारने १९७१ मध्ये त्यांना पद्मश्री, तर १९९१ मध्ये पद्मविभूषण देऊन गौरवले.
१९९७ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते - दिग्दर्शक चेतन आनंद यांचे निधन. त्यांचे हीररांझा, आखरी खत, हिंदुस्तान की कसम, फंटूश, टॅक्सी ड्रायव्हर आदी चित्रपट लोकप्रिय होते.
