माझ्या जीवनात मी ‘संसार’ या शब्दाला फार महत्त्व देतो. ‘सुखी संसार’ व्हावा यासाठी जीवनात मी अनेक गोष्टी केल्या, अनेक गोष्टींचा त्याग केला. त्यामुळे मी संसारात यशस्वी झालो. माझ्या यशामध्ये माझी पत्नी नीलम, मुलगा नीलेश व सून प्रियांका, नीतेश तसेच माझे मित्र यांचा मोठा वाटा आहे. जीवनात मी पूर्णपणे निर्व्यसनी राहिलो हेही यशाचे कारण आहे.
तवांगची वेदना ‘तिठय़ावरच्या गावा’ची आहे. ते तिघांनाही हवे असते आणि त्याच वेळी ते कोणाचेही नसते! हिमालयाच्या दक्षिणेकडील पाणलोट क्षेत्रात, म्हणजे भौगोलिकदृष्टय़ा भारतात; तिबेटी लामांनी ३५० वर्षापूर्वी इथे बांधलेल्या मठामुळे सांस्कृतिकदृष्टय़ा तिबेटी परंपरेशी जवळीक असलेले आणि त्याच आधारावर स्वामित्वाचा हक्क सांगण्यात येत असल्याने चीनच्या सावटाखाली अशा तिहेरी पेचात तवांग सापडले आहे. तवांगवासीय गेली अनेक वर्षे ‘आयडेंटिटी क्रायसिस’च्या लढाईला तोंड देत आहेत. त्यांचे भवितव्य काय असेल, हे सांगता येत नाही....
गंमतीचा भाग सोडा आणि या वर्णनावरून अमेरिकेतली मराठी माणसं माणूसघाणी आहेत, असा स्वस्त निष्कर्षही काढू नका. एकेकाळी अमेरिकेत जाणं हे तुकोबांच्या सदेह वैकुंठाला जाण्याइतकं नवलाईचं आणि रोमांचकारी होतं. त्या वेळी तर विमानप्रवास केलेल्या माणसाला भेटायलाही माणसं जमायची.. काशीला जाऊन आलेल्याच्या पाया पडल्यावर काशीयात्रेचं पुण्य लाभतं, अशातलाच तो प्रकार. पण, हल्लीच्या काळात मराठी माणसांचं परदेशांत, विशेषत: अमेरिकेत जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नुसतं पर्यटनाला जाणारेही खूप आहेत. त्यामुळे, जसं आपल्याला अमेरिकेचं तेवढं कौतुक उरलेलं नाही, तसं तिथे राहणा-या मराठीजनांनाही सातासमुद्रापार मराठी माणूस भेटण्याचं उरलेलं नाही....
कारण काय आहे बाबा, या कन्यकासुद्धा तुमच्या ‘कन्येसारख्याच मराठी घरांतून आलेल्या आहेत, पालकांनी दिलेली ‘शिदोरी’ घेऊन- त्या शिदोरीत कॉमन असं काय आहे माहीतेय? मुलाहिजा. प्रत्येक गोष्टीचा, प्रसंगाचा, व्यक्तीचा मुलाहिजा बाळगतात त्या. आपल्या बबडीच्या अभ्यासक्रमात हा विषय ऑप्शनला टाकला ना तिने, म्हणून सगळा गोंधळ उडालाय. अहो, या मुलीसुद्धा गप्पा मारतात, सेटवर बागडतात, फोन कानाला लावून फिरत फिरत बोलत राहतात- पण कधी? काम चालू नसताना. मेकअप करतात तो भूमिकेनुसार- कारण भूमिकेच्या जवळ जाणारा मेकअप हा महत्त्वाचा मार्ग असतो- यांना वेगवेगळय़ा भूमिकांसाठी वेगवेगळा मेकअप करायचा ,अशी इच्छा असते- बबडी एकच एक प्रकारचा स्वत:चा मेकअप करते आणि मुली सेटवर येतात- सहकलाकारांसोबत काम करताना आपल्या बाजूने त्यात अधिक रंगत आणण्याचा प्रयत्न करायला- इथल्या तीनही खोल्यांत त्या सारखाच वेळ घालवतात आणि चांगल्या गोष्टी घेऊन जपून ठेवतात. ...

आज मी, सतीश मनवर आणि प्रशांत पेठे खूप चांगले मित्र आहोत; पण २००८ च्या मे-जून महिन्यात मैत्रीचं समीकरण अजून प्रस्थापित व्हायचं होतं. आज सांगायचं झालं, तर सतीशच्या पुढच्या प्रत्येक सिनेमात त्यानं मला घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. त्याची सिनेमाची भाषा आणि भावनांची मांडणी फार युनिक आहे. त्याचं न बोलणं मला समजतं. रिलॅक्स असतानाचं काहीही बोलणं मला आवडतं. प्रशांत किती भावनाप्रधान आहे, हे आता मला कळलंय. प्रशांतच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी पडद्यावर किंवा पडद्यामागे तर नक्कीच असणार हे मी तरी ठरवून टाकलंय. सरकारच्या धोरणांमध्ये आणि निवडणुकांच्या धामधुमीत फुगवून नंतर दुर्लक्षित जाणारे शेतकरी आणि त्यांचे प्रश्न. तसाच ‘गाभ्रीचा पाऊस’ उपेक्षित राहू शकला असता; पण प्रशांत गच्च बंद केलेल्या मुठीत स्वत:चा आत्मविश्वास आणि स्वप्नं घेऊन लढत राहिला. त्यामुळे आज अनेक पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात या सिनेमाला मान मिळालाच; पण त्याचबरोबर जिथे आम्ही ‘गाभ्रीचा पाऊस’ शूट केला, त्या ‘जळू’ गावातही प्रशांतनं गावकऱ्यांसाठी खास शो दाखवला. अमेरिकेत मुख्य थिएटरमध्ये ‘गाभ्री’चा रेग्युलर शो चालू असताना. त्या गावात पोहोचण्याचा वेळ आणि पैशाचा आणि त्याहूनही अधिक भावनांचा खर्च करण्याचा वेडेपणा कोण करेल? प्रशांतनं केला. प्रिय प्रशांत आणि सतीश. तुमचा मला खूप अभिमान आहे. हा लेख तक्रारींचा किंवा हळहळीचा नाही पण मला माझ्या झालेल्या नुकसानीचं कॉम्पेन्सेशन हवं आहे....
राज्य म्हटले की, राजा आला, प्रधान आला, प्रजा आली, राजाचा दरबार आला, राज्यातील घडामोडींची नोंदींची खबरबात मांडणारा आपला ‘बखरकार’ही आला. एकविसाव्या शतकातील ‘लोकशाही महाराष्ट्र राज्या’ची अशीच ‘बखर’ एका साहित्यिकाने आपल्या परीने लिहिली. या दरबाराचे हे राग आणि रंग-
...
आपले दिग्दर्शक नेमकं काय करतात? काल-परवापर्यंत प्रेक्षकांनी दाखवलेल्या मार्गावरून कथानकाला घेऊन जाण्याचं काम ते मोठय़ा तन्मयतेने करीत असत. आज मात्र सिनेमा आणि प्रेक्षक मिळून अधिक प्रगल्भ होत आहेत. त्याचबरोबर नवनवीन कथाकल्पना वापरून प्रेक्षकांची अभिरूची लक्षात न घेतादेखील उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकते, हे नव्या युगाने दाखवून दिले आहे. मात्र त्यापूर्वीचे दिग्दर्शक नुसतेच दिशादर्शक होते? कलावंतांना प्रेक्षकांनी आकारून दिलेला मार्ग दाखवणारे होते की मग आणखी कोणी?
...