कधी कधी ना आपल्याला अगदी भरून येतं, गहिवरून येतं..ठाणेकरांच्या आणि विशेषत: ठाणेकर रेल्वे प्रवाशांच्या नशिबात हा सुखद योग लिहिला असावा, याची मला आता खात्री पटलीय.
दिलेला शब्द न पाळणे ही एकेकाळी राजकीय पुढा-यांची मक्तेदारी होती. पण आता मध्य रेल्वेने ती मोडून काढून आपण त्यापेक्षाही एक पाऊल पुढे असल्याचे आपल्या कृतीने दाखवून दिले आहे. ...
.. चला, 14 फेब्रुवारीला फक्त प्रेमाची, स्नेहभावाची, ममत्वाची देवाण-घेवाण करू, या दिवशी पेट्रोल अजिबात घ्यायचे नाही...
दररोज हजारो ठाणेकर ही जीवघेणी कसोटी देत असतात. गेली अनेक वर्षे सकाळ-दुपार-संध्याकाळ अगदी तिन्ही त्रिकाळ हे अरुंद जिने प्रवाशांची घुसमट करत आहेत, तिथे चेंगराचेंगरी दररोजची आहे. अद्याप यापैकी कुठल्याही जिन्यावर काहीही दुर्घटना घडलेली नाही हे केवळ प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याचे संकेत आहेत. ...
आम्हाला कश्शाचेही सोयरसुतक नाही, आम्हाला कशाचीही तमा नाही.. लोकांचे, जनतेचे, राज्यांचे प्रश्न गेले उडत..आमचे भत्ते, आमच्या सोयीसुविधा मिळाल्याशी कारण..
...
न्यायालयाच्या दट्टय़ानंतर अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठाणे जिल्ह्यात ‘सुरू असलेल्या’ मोहिमेत ‘कर्तव्यकठोर’ यंत्रणांची टाच रामजितच्या घरावर येणार होती. तशी त्याला नोटिसही आली होती. आपले घर पाडले जाणार याचे दडपण त्याला असह्य झाले, पेलवेनासे झाले आणि ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या रात्री त्याने या दडपणातून मोकळं होण्याचा त्याच्यापुरता मार्ग शोधला.
...
पण आपण सुज्ञ आहोत, असं आता सारेच म्हणताहेत. हा सूज्ञपणा दाखवून द्यायची हीच वेळ आहे. कोकणच्या धूळमातीत विकासाच्या डांबरी सडका नेण्याचे कर्तृत्व दाखवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री नारायण राणे यांनी कल्याण-डोंबिवलीला दर्जेदार शहरं बनवण्याची ग्वाही दिलीय. इतरांसारखा बोलघेवडेपणा, शिवराळपणा न करता मतदारांना विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलंय....
संपामुळे कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये माल आला नाही आणि खरेदी-विक्रीचेही व्यवहार झाले नाहीत, तर मग लगोलग ही भाववाढ झाली कशी, हे कोडे केवळ व्यापारीच उघड करू शकतात. माथाडींच्या या संपाचा पुरेपूर फायदा घेताना या व्यापारी आणि अडत्यांनी एका बाजूला संपामुळे तुमचा माल विकला जाणार नाही, तो खराब होईल, अशी भीती शेतक-यांना घालून त्यांच्याकडून कवडीमोलाने माल खरेदी केला. आता तोच माल संपामुळे बाजारात टंचाई असल्याचे भासवून चढय़ा दराने ते विकत आहेत....
ठाण्यात पूर्वेकडे कोपरीला खाडीकिना-याला लागून खारफुटी आणि मिठागरांचा सारा परिसर म्हणजे नानाविध पक्ष्यांचा किलबिलता संसार. खगकुळातल्या कितीएक जाती-प्रजाती, पाहुणे येथे यायचे आणि जायचे....
कोणे एके काळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत वॉर्ड क्रमांक एक म्हणजे मांडा-टिटवाळा भाग होता. यथावकाश या मोठ्या (आकारानेही) वॉर्डाचं विभाजन झालं. त्यात पहिला नंबर गेला. पण नागरी सुविधांच्या आघाडीवर जे डोळे दिपवणारं चित्र दिसतं, ते बघितल्यावर कुणीही या भागाला आजही पहिला नंबर हसत-हसत देऊन टाकेल. फक्त, सुरुवातीचा नव्हे; तर शेवटचा.. म्हणूनच महापालिका म्हंजे काय रे भाऊ हा प्रश्न टिटवाळावासीयांना न पडता तरच नवल!...