Home | सुवर्णमुद्रा | किर्लोस्करवाडी

किर्लोस्करवाडी

image

किर्लोस्करवाडीत तयार झालेलं पहिले उत्पादन म्हणजे लोखंडी नांगर. शेतक-यांचे श्रम कमी व्हावेत, या हेतूने हा नांगर तयार करण्यात आला होता.

सांगली जिल्ह्यात कुंडल रोड या रेल्वे स्थानकाजवळचा एक भूखंड तत्कालीन औंध संस्थानाधिपती बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी लक्ष्मण किर्लोस्कर या उद्यमशील युवकाला दिला, त्या घटनेचं यंदा शंभरावं वर्ष आहे. हा भूखंड म्हणजेच महाराष्ट्रातली आणि देशातलीही पहिली औद्योगिक वसाहत किर्लोस्करवाडी. लक्ष्मणरावांनी १९१० मध्ये किर्लोस्करवाडीची स्थापना केली. युरोपमधल्या औद्योगिक वसाहतींच्या धर्तीवर शाळा, महाविद्यालयं, बगिचे, निवासी इमारती, कारखाना, रुग्णालय या सर्वानी परिपूर्ण अशी औद्योगिक वसाहत उभारण्याचा ध्यास त्यांनी घेतला. किर्लोस्करवाडीत तयार झालेलं पहिले उत्पादन म्हणजे लोखंडी नांगर. शेतक-यांचे श्रम कमी व्हावेत, या हेतूने हा नांगर तयार करण्यात आला होता. अल्पावधीतच हा लोखंडी नांगर आणि त्यापाठोपाठ तयार केलेलं चारा कापणी यंत्र ही किर्लोस्कर उद्योगसमूहाची ओळख बनली. पुढच्या काळात हा उद्योगसमूह प्रसिद्ध झाला तो वेगवेगळी इंजिनं आणि शेतीपंपांमुळे.