रायगडाचं स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी वसवण्याचं महाराजांनी निश्चित केलं. रायगडाचं जुनं नाव रायरी.
आज पंजाब किंवा उत्तरेकडे महाराष्ट्रापेक्षा अधिक तगडे कबड्डीपटू तयार होतात. तरीही मराठी माणसाला या खेळाविषयी वाटणारी आत्मीयता कमी झालेली नाही. ...
दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असलेल्या गरिबापासून ऐश्वर्यवंतांपर्यंत आणि नऊ महिन्यांच्या बालकापासून ९० वर्षाच्या वृद्धापर्यंत लाखो लोक जात, पात, धर्म, भेद विसरून या वारीत सहभागी होतात....
दरवर्षी २० मार्चला चवदार तळय़ाचा वर्धापन दिन, 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन अशा ऐतिहासिक घटनांच्या आठवणी जागवण्यासाठी जमणा-या शेकडो जणांमुळे चवदार तळ्याचा परिसर तेवढय़ापुरता गजबजून जातो....
अल्प किमतीत अगदी पोटभर अशा या वडापावचा चस्का गरीबालाही लागतो आणि बडय़ा असामीलाही. ...
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा ख-या अर्थाने खेडोपाडी आणि गरिबांच्या झोपडीपर्यंत नेली. ...
पहिली उपलब्ध लावणी ही चौदाव्या शतकातली असून ती मन्मथ शिवलिंग यांनी कराडच्या भवानीवर लिहिलेली आहे. मात्र आजच्या लावणीचा उगम उत्तर पेशवाईत झालेला आहे. ...
एसटीच्या प्रवासात अनेक वळणं आली, त्यातली काही इतकी धोकादायक होती की एसटीचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. ...
सुभाषचंद्र मुखोपाध्याय यांच्यापासून अशोक बाजपेयींपर्यंतच्या भारतीय साहित्यिकांनी जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना हजेरी लावली, तेव्हा त्यांनीही मान्य केलं की, हे फक्त महाराष्ट्रातच घडू शकतं. ...
किर्लोस्करवाडीत तयार झालेलं पहिले उत्पादन म्हणजे लोखंडी नांगर. शेतक-यांचे श्रम कमी व्हावेत, या हेतूने हा नांगर तयार करण्यात आला होता. ...