बहादुरी...
कमांडर (सैनिकाला) : तू लढाईत कोणती बहादुरी केलीस?सैनिक : मी एका शत्रूचे हात आणि पाय कापून टाकले.कमांडर : तू मूर्ख आहेस. तू त्याचे मस्तक का नाही उडवलेस?सैनिक : ते आधीच कुणी तरी उडवलेले होते. इंटरव्ह्यूच्या वेळेला एका उमेदवाराला विचारले जाते की, समजा, तू विमानाने प्रवास करीत आहेस आणि अचानक विमानाला आग लागली तर तू काय करशील?तो म्हणतो की, मी पॅराशूट घेऊन खाली उडी टाकीन.पण समजा, काही कारणाने पॅराशूट उघडले गेले नाही तर तू काय करशील?तो म्हणतो, मी ते खाली येऊन उघडीन. एका भिका-यानं आवाज दिला, ‘शिळंपाकं काय असलं तर वाढा हो मावशी.’ आतून आवाज आला, ‘पुढं चालू लागा, मालकीण घरात नाहीय.’भिकारी म्हणाला, ‘मी शिळंपाकं मागतोय. मालकीण नाही.’ - व्ही. एस. वागळे, ठाणे व्याकरणाच्या तास सुरू होता. शिक्षिकेने मोरूला विचारलं, ‘‘काय रे, ‘मी सुंदर आहे’ या वाक्याचा काळ कोणता?’’तिच्या चेह-याकडे पाहून मोरूनं उत्तर दिलं ‘‘भूतकाळ.’’ - रंजन पाटील, भायखळ
