Home | मजेत मस्त तंदुरुस्त | शुद्धता की पहचान

शुद्धता की पहचान

  • डाळी, कडधान्य, हळद
    डाळी, कडधान्यं आणि हळदही पिवळी दिसावी यासाठी या पदार्थाना रंग लावला जातो.
  • कसं ओळखाल?
    20 मिली कोमट पाण्यात चमचाभर हळद घालावी. त्यात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड किंवा घरात सहज उपलब्ध असेल असा कोणताही अ‍ॅसिडिक पदार्थ घालावा. पाण्याचा रंग गुलाबी, जांभळा झाल्यास पदार्थाना मेंटनिल यलो रंग लावला आहे हे ओळखावं.
  • परिणाम
    अशा प्रकारच्या भेसळीमुळे साधारणत: पोटाचे विकार बळावतात. पण सततच्या सेवनाने कॅन्सर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
 
  • मोहरी आणि मोहरीचं तेल
    मोहरी म्हणून कधी कधी अर्जेमोने नावाच्या फुलाच्या बिया ज्या आकाराने मोठय़ा असतात त्या वापरल्या जातात.
  • कसं ओळखाल?
    मोहरी थोडी दाबून किंवा कुटून पाहावी. यात मोहरीऐवजी बियांचा वापर झाला असल्यास त्या आतून पांढ-या असल्याचं लक्षात येतं. त्याचप्रमाणे त्या बाहेरूनही खडबडीत असतात. याउलट मोहरी बाहेरून गुळगुळीत आणि आतून पिवळी असते.
    परिणाम
    सातत्याने सेवन झाल्यास जलोदर होतो. तरुण त्याचप्रमाणे ज्येष्ठ वयोगटातील व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
  • काळीमिरी
    रंग आणि आकारातील साधम्र्यामुळे काळीमिरीसोबत पपईच्या बिया मिसळून विक्री केली जाते.
  • कसं ओळखाल?
    एका भांडय़ात अल्कोहोल घेऊन त्यात काळीमिरी घालावी. काळीमिरी भांडय़ात तळाशी जमा होते तर पपईच्या बिया वर तरंगतात.
  • परिणाम
    पपईच्या बियांमुळे किडनीच्या गंभीर समस्या निर्माण होतात.
 
  • पनीर, खवा, कंडेन्स्ड मिल्क आणि दूध
    दूध आणि पनीर, खवा, कंडेन्स्ड मिल्क यांसारखे दुग्धजन्य पदार्थ घट्ट आणि पांढरेशुभ्र दिसावेत यासाठी त्यात स्टार्च मिसळलं जातं.
  • कसं ओळखाल?
    20 मिली पाण्यात यांपैकी कोणताही पदार्थ मिसळून ते मिश्रण उकळावं. थंड झाल्यावर त्यावर दोन थेंब आयोडिन टाकावं. पदार्थाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्च मिसळलं आहे असं समजावं.
  • परिणाम
    अस्वच्छ, प्रक्रिया न केलेलं पाणी आणि स्टार्च यांमुळे पोटाचे विकार होतात. स्टार्चमुळे पदार्थाची पोषणमूल्यं कमी होतात.
 
  • हिरव्या मिरच्या, वाटाणे आणि हिरव्या रंगाच्या भाज्या
    भाज्या हिरव्यागार दिसाव्यात, यासाठी मलकाइट ग्रीन नावाचा हिरवा रंग वापरला जातो.
  • कसं ओळखाल?
    पांढ-या ब्लॉटिंग पेपरवर यांपैकी भाजी ठेवून पाहावी. त्यांत भेसळ असल्याचं पेपरच्या बदललेल्या रंगावरून लक्षात येईल.
  • परिणाम
    अशा भाज्या दीर्घकाळापर्यंत पोटात जात राहिल्यास कॅन्सरसारखे विकार होतात. 
 
  • कॉफी पावडर
    कॉफीला दाटपणा यावा त्याचप्रमाणे कॉफीचा रंग अधिक गडद दिसावा यासाठी त्यात चिंचेच्या बियांची पूड मिसळली जाते.
  • कसं ओळखाल?
    एका भांडय़ात पाणी घेऊन त्यावर कॉफीची चिमूटभर पावडर भुरभुरावी. कॉफी पावडर पाण्यावर तरंगते. तर चिंचेच्या बियांची पावडर काही सेकंदातच पाण्यात खाली पोहोचते. तसंच तिच्यामुळे पाण्याचा रंग बदलतो.
  • परिणाम
    डायरिया त्याचप्रमाणे पोटाचे अन्य विकार, चक्कर येणं, सांधेदुखी यांसारखे विकार भेसळयुक्त कॉफीच्या सेवनाने संभवतात.
 
  • आइस्क्रीम
    आइस्क्रीमच्या चवीचा उग्रपणा कमी व्हावा यासाठी त्याचप्रमाणे पांढ-या रंगाचं आइस्क्रीम चकचकीत दिसण्यासाठी त्यात वॉशिंग पावडर मिसळली जाते.
  • कसं ओळखाल?
    आइस्क्रीमवर थोडं लिंबू पिळावं. लिंबू टाकल्यावर ते सोडय़ाप्रमाणे फसफसलं तर त्यात वॉशिंग पावडर आहे असं समजावं.
  • परिणाम
    अशा आइस्क्रीमच्या सेवनामुळे पोटाचे आणि किडनीचे विकार उद्भवतात.