काँटिनेंटल, थाई, चायनीज खाद्यसंस्कृतीचा विस्तार होऊ लागला तसा आपल्याकडे भोपळी मिरचीचा वापरही मोठय़ा प्रमाणात वाढला. या फळभाजीपासून बनवलेले पदार्थ रुचकर असतातच शिवाय त्यातील वैशिष्टय़पूर्ण गुणधर्मामुळे विविध वेदनाशामक औषधांतही त्यांचा वापर केला जातो.
बस स्टॉप, रेल्वेस्थानकांवर लागलेले जाहिरातींचे होर्डिग्ज, टीव्हीवरच्या मालिका आणि मासिकांची मुखपृष्ठ कळत-नकळत आपलं लक्ष वेधून घेत असतात. विशेषत: त्यातील आकर्षक व्यक्तिमत्त्वं पाहून ‘आपणही असंच सुंदर दिसायला हवं’, अशी भावना निर्माण होते. पण सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं महत्त्वाचं. त्यासाठी आपण सुंदर आहोतच, अशी खूणगाठ मनाशी पक्की करायला हवी....
पाकीटबंद खाद्यपदार्थ विकत घेताना त्यावरील अॅगमार्क पाहणं महत्त्वाचं असतं. पण सर्वच खाद्यपदार्थाच्या बाबतीत आणि सर्वानाच ते शक्य होतं असं नाही. बाजारात दिसणारे हिरवेगार वाटाणे, पिवळीधम्मक केळी किंवा अगदी दुकानात घेतल्या जाणा-या डाळी, कडधान्य, तेल वगैरे पदार्थाची शुद्धता तपासून पाहणं तसं कठीणंच. आज महागाईच्या दिवसांत सर्वच वस्तूंच्या प्रचंड वाढल्या असताना थोडय़ा स्वस्तातल्या वस्तू खरेदी करण्याला झुकतं माप दिलं जातं. पण बाजारभावापेक्षा स्वस्त असलेले हे पदार्थ बरेचदा भेसळयुक्त असल्याचं आढळतं. हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महाग ठरू शकतात. त्यामुळे हे पदार्थ उपयोगात आणताना थोडी सावधगिरी बाळगायला हवी. खाली दिलेल्या सोप्या प्रयोगांतून नेहमीच्या वापरातील काही पदार्थाची शुद्धता घरच्या घरी ओळखणं शक्य आहे.
...
अभ्यास करताना रिझल्टचा विचार करणं म्हणजे टेन्शनला आमंत्रणच! आपलं विचारचक्र टेन्शनच्या रस्त्यावर वेगानं धावू लागल्यास प्रयत्नांवरील लक्ष उडून जातं. एकाग्रता कमी होते आणि आत्मविश्वासाला तडा जातो. यासाठी भावनांचं आणि विचारांचं योग्य, काळजीपूर्वक नियोजन करणं, हाच विजय मिळवण्याचा खात्रीलायक उपाय ठरतो....
कोथिंबिरीसारखी दिसणारी, सॅलड वर्गात मोडणारी ‘सेलरी’ पालेभाजी चवीला खूप उग्र आणि किंचित खारट असते. रक्तदाबावरील नियंत्रक, वेदनाशामक, लो कॅलरी, असे अनेक औषधी गुणधर्म असलेली सेलरी पदार्थाच्या सजावटीतही वापरली जाते....
औषधं घेऊन माणूस दीर्घायुषी होऊ शकतो असं म्हणतात. पण त्याची शरीरप्रकृती सुदृढ राहीलच असं नाही. मात्र नैसर्गिक उपायांसह अँटी-ऑक्सिडंट्स म्हणजे जीवनसत्त्वयुक्त शरीरपोषक आहार घेतल्यास दीर्घायुष्याबरोबर सुदृढताही लाभेल. मानवी शरीराचं आरोग्य उत्तम ठेवण्याची जबरदस्त क्षमता अँटी-ऑक्सिडंट्समध्ये असते.
...
आम्हाला काबरेनेटेड ड्रिंक्स आवडत नाहीत, असं सांगणा-या व्यक्ती हातांच्या बोटांवर मोजण्या इतपतच सापडतील. खरं तर इतर गोड पदार्थापेक्षाही काबरेनेटेड ड्रिंक्स दातांचं आरोग्य जास्त बिघडवतात....
‘देशात 42 टक्केमुले कुपोषित’ ही बातमी पंधरा दिवसांपूर्वी झळकली होती. बातमी वाचून ‘आपल्यासाठी ही लाजिरवाणी बाब आहे’, अशा आशयाची वक्तव्यं अनेकांच्या तोंडून निघाली असतील. प्रत्यक्षात अशी वक्तव्यं करणं योग्य नाही, तर कुपोषण निर्मूलनासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. कुपोषण आणि कुपोषणामुळे होणारा पर्यायी अॅनिमिया टाळण्यासाठी काय खावं, यासाठी हा लेखन प्रपंच....
पावलं, खासकरून टाच ही शरीराचा सर्व भार पेलते. माणसाचं वजन कितीही असलं तरी ते पेलण्याची क्षमता टाचांमध्ये असते. अशा या टाचांना आपण एवढा त्रास दिल्यावर त्या टाचा कधी ना कधी आपल्याला त्रास देणारच!...
पोटातल्या कृमी ही आपल्या देशातील मुलांमध्ये आढळणारी कॉमन समस्या आहे. हा त्रास मुलांना का होतो, त्याची पालकांनी माहिती करून घेतली पाहिजे. तसंच तो होऊ नये, याबाबत पालकांनी सतर्क राहिलं पाहिजे....