`भारताचा पिकासो' म्हणून ओळखले जाणारे जागतिक कीर्तीचे चित्रकार एम एफ हुसेन यांचे लंडनमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
`भारताचा पिकासो' म्हणून ओळखले जाणारे जागतिक कीर्तीचे चित्रकार एम एफ हुसेन यांचे लंडनमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. या मनस्वी चित्रकाराचा हा संक्षिप्त जीवनपट.......
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दोन दशकांत ज्या एका माणसानं भारतीयांपुढे ‘चित्रकारा’ची प्रतिमाच साक्षात् उभी केली, तो म्हणजे मकबूल फिदा हुसेन! ...
विख्यात चित्रकार एम एफ हुसेन यांना नामवंतांनी वाहिलेली आदरांजली......
संकुचित मनोवृत्तीच्या लोकांमुळे एम एफ हुसेन यांच्यासारख्या महान कलावंताला अखेरची वर्षे देशाबाहेर काढावी लागली, याबद्दल खंत व्यक्त करत, राष्ट्रपती व पंतप्रधानांसह अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली.
...
मी अभ्यासाकडे कधीच लक्ष दिलं नाही, तरीही मी सर्वाचा आवडता होतो. याचं कारण मुलांना माझी चित्रं आवडत, विशेषत: शिक्षकांची अर्कचित्रं! अकरा वर्षाचा असल्यापासूनच मी पोर्ट्रेट्स काढू लागलो. शाळेमध्ये काही विशेष कार्यक्रम असेल तेव्हा फळ्यावर त्या विषयाशी संबंधित चित्रं काढणं हे काम माझ्याकडेच असे. ...
हुसेन यांच्या चित्रांमधल्या मानवाकृती अनेकदा भारतीय माणसांचा वर्तमान किंवा इतिहास मांडणा-याच असत. हुसेन यांच्यावर अनेक आक्षेप त्यांच्या हयातीत घेतले गेले, परंतु इतका काळ कार्यरत राहण्यामागचे इंगितही समजून घेतले पाहिजे....
एका मराठी दिवाळी अंकाने हुसेन यांना आधुनिक भारतीय चित्रकलेचा मॅस्कॉट ठरवणारा लेख छापून त्यात हुसेन यांची ही वादग्रस्त चित्रेही छापली होती. तो अंक कुठे जाळला गेल्याचे वा त्यावर खटला भरला गेल्याचे ऐकिवात नाही, पण नेमक्या याच चित्रांआधारे हुसेन यांच्यावर गावोगाव तक्रारी-खटल्यांचे सत्रच सुरू झाले आणि लोकभावनांपुढे कचखाऊपणा आधीच सिद्ध केलेल्या या ज्येष्ठ चित्रकाराने देशच सोडणे पसंत केले....
मकबूल फिदा हुसेन ही भारतात आणि जगात एक जिवंत दंतकथा झाली होती....
विठुरायाच्या नगरीत जन्मलेले विश्वविख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या निधनाने अवघी पंढरी हळहळली..! 1995 मध्ये पंढरीभूषण पुरस्कारासाठी आले, तीच हुसेनसाब यांची अखेरची पंढरीची भेट ठरली. ...