मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्षांविरोधात वॉरंट
माले (मालदीव)- मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदावरुन पायउतार झालेले मोहम्मद नशीद आणि एका माजी संरक्षण मंत्र्याविरोधात फौजदारी न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याची माहिती अधिका-याने गुरुवारी सांगितले.
"नशीद आणि माजी संरक्षणमंत्री आदम गफूर यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले असून गफूर हे नशीद यांच्या मंत्रीमंडळातील एक वरीष्ठ नेतेही आहेत ", असे अधिका-याने सांगितले.
दुस-या एका पक्षाच्या नेत्याने या बातमीला दुजोरा दिला आहे, पण मालदीवचे पोलिस प्रमुख अब्दुल्ला रियास यांनी याबाबतची काही माहिती नसल्याचे सांगितले.
मालदीवमधील फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अब्दुल्ला मोहम्मद यांना अटक करण्याचे आदेश नशीद यांनी लष्कराला दिल्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. हा रोष टोकाला गेल्यामुळे मंगळवारी मोहमद नाशीद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मालदीवमध्ये पहिल्यांदाच झालेल्या बहुपक्षीय निवडणुकांमध्येही माजी मानवी आयोगाच्या प्रचारकांनी सत्ताधा-यांचा पराभव केल्याने नशीद यांच्यासाठी हा दुसरा धक्का मानण्यात येत आहे.
