Home | विदेश | मालदीवचे राष्ट्राध्यक्ष नशीद यांचा राजीनामा

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष नशीद यांचा राजीनामा

माले (मालदीव)- मुख्य न्यायमूर्तींना अटक केल्यामुळे वादात सापडलेले मालदिवचे राष्ट्रपती मोहमद नशीद यांना जनतेच्या रोषाला सामोरे जाऊन अखेर मंगळवारी राजीनामा द्यावा लागला.

फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अब्दुल्ला मोहम्मद यांना अटक करण्याचे आदेश नशीद यांनी लष्कराला दिल्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.

याविरोधात गेल्या काही दिवसापासून लोकांनी मालदीवमध्ये आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे नशीद यांनी अखेर पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेऊन पदभार उपराष्ट्राध्यक्ष  मोहम्मद वहीद यांच्यावर सोपवल्याचे लष्कराचे ब्रिगेडियर अहमद शियाम यांनी सांगितले.

मालदीवमध्ये पहिल्यांदाच झालेल्या बहुपक्षीय निवडणुकांमध्येही माजी मानवी आयोगाच्या प्रचारकांनी सत्ताधा-यांचा पराभव केल्याने नशीद यांच्यासाठी हा दुसरा धक्का मानण्यात येत आहे.