Home | विदेश | फिलीपिन्समध्ये भूकंप;44 ठार

फिलीपिन्समध्ये भूकंप;44 ठार

मनिला- फिलीपीन्समधील तिस-या क्रमांकाच्या सर्वात मोठय़ा बेटावर सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान 44 जण मरण पावले. यामध्ये मोठय़ा संख्येने शाळकरी मुलांचा समावेश होता. 6.8 रिश्टर क्षमतेच्या या हादऱ्यामुळे इमारती कोसळल्या तर अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झाला. या भूकंपानंतर ताबडतोब सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, नंतर हा इशारा मागे घेण्यात आला.  फिलीपीन्समधील नेग्रोस बेटावरील किनारपट्टीलगतच्या सिटी ऑफ डुमागेटेपासून 70 किमी.वर भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने सांगितले. मरण पावलेल्यांमध्ये दोन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता, असे वृत्त फिलीपीन्सच्या वृत्तसंस्थेने दिले आहे. या शाळा पूर्णपणे कोसळल्याने त्याखाली दबून या मुली दगावल्या,अशी माहिती पोलिसांनी दिली. भूकंपाच्या या शक्तिशाली हाद-यानंतरही भूकंपपश्चात हादरे बसत होते व त्यातील एकाची क्षमता 6.2 रिश्टर असल्याची नोंद झाल्याचे फिलीपीन्सच्या आपत्ती व्यवस्थापन अधिका-यांनी सांगितले