Home | विदेश | अल-कईदाचा पाकिस्तानातील प्रमुख ठार

अल-कईदाचा पाकिस्तानातील प्रमुख ठार

इस्लामाबाद- पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तान परिसरात अमेरिकेने गुरुवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-कईदाच्या पाकिस्तानातील प्रमुखासह चार दहशतवादी ठार झाले.

अमेरिकेने बुधवारपासून ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. अमेरिकेच्या टेहळणी विमानांनी  गुरुवारी वझिरिस्तानातील मिरनशहा भागात केलेल्या मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यात हरकत-उल-मुजाहिद्दीन या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या बादर मन्सूर या माजी प्रमुखासह चार जण ठार झाल्याचे वृत्त पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. काश्मिरमधील अतिरेकी कारवायांमध्ये मन्सूरचा हात होता.

मन्सूर हा अल-कईदाचा पाकिस्तानातील प्रमुख होता. अनेक दहशतवादी कारवाईमध्ये प्रमुखाची भूमिका बजावल्यामुळे मन्सूर हा अमेरिकेचे मुख्य लक्ष्य होता.

अमेरिकेच्या या ड्रोन हल्ल्यात असून आतापर्यंत यात  14 दहशवादी ठार झाले आहेत.