Home | आयपीएल | मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्सवर विजय

मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्सवर विजय

बेंगळूरु- इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी मुंबई इंडियन्स संघाने बेंगळूरु रॉयल चॅलेंजर्स संघाचा 57 धावांनी पराभव केला.

मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत चार बाद 191 धावा केल्या. सलामीवीर रायन मॅकरेलनने 40, अंबाती रायडूने 46, तर ज्याँ पॉल द्युमिनीने 42 धावा केल्या.

या धावसंख्येचा पाठलाग करताना बेंगळूरु रॉयल चॅलेंजर्स संघाला 20 षटकांत नऊ बाद 131 धावाच करता आल्या.