२६ जुलैच्या जलप्रलयाला प्रामुख्याने कारणीभूत असलेल्या मिठी नदीवरच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘जी’ आणि ‘ई’ ब्लॉक अर्थात एमएमआरडीए तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची कार्यालये आहेत, मिठीच्या मुखाशी वांद्रे-वरळी सी लिंक आणि रेक्लेमेशन वसले आहे. त्यांना कुणीही हात लावत नाही. सहार व सांताक्रुझ विमानतळ मिठीची वाट अडवून उभे आहेत. पण त्यांना कोणीही विचारत नाही. कुर्ला व जरीमरीच्या लोकवस्तीला मात्र दोष देवून हटवले जाते.
तालुक्यातील १४ गावांवर २६ जुलै २००५ रोजी कोसळलेलं आभाळ अजूनही तसंच आहे. त्या मध्यरात्री दासगांव, जुई, रोहन आणि कोंडीवते गावांवर दरड कोसळल्यामुळे मोडलेले संसार अजूनही सावरलेले नाहीत....
२६११ ही सुरक्षा हेल्पलाइन शास्त्रज्ञ दिनकर बोर्डे यांनी तयार केली आहे. तुम्ही देशभरात कोणत्याही ठिकाणी आणीबाणीच्या परिस्थितीत सापडलात तरी या हेल्प लाइनवरून मदतीची हाक मारून तुम्ही आपली सुटका करू शकाल. ...
२६ जुलै २००५ या दिवसाचा फटका मुंबईसोबत ठाणे व रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांनाही बसला. २६ जुलैच्या निमित्ताने या शहरांमध्ये जागवल्या गेलेल्या जलप्रलयाच्या स्मृतींचा हा लेखाजोखा......
२६ जुलै २००५च्या जलप्रलयात ठाणे जिल्हा परिषदेच्या ४२६ शाळांची मोठी हानी झाली होती. या शाळांच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी १५ लाख ३७ हजारांचे अनुदान मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाचा गेली तीन वर्षे सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे....
पनवेल शहरासह अवघ्या तालुक्यालाच महापुराचा वेढा घालणा-या २६ जुलैच्या अवकाळी पावसाला पनवेलकर आजही विसरलेले नाहीत. ...
यंदा लाटांचे उंच-उंच झोके घेणा-या भरतीचे अंदाज, मुसळधार पावसाची शक्यता हे सारे प्रत्यक्षात आल्यास मुंबईत पुन्हा ‘तसेच’ काही होईल की काय, या आशंकेने धास्तावलेल्या मनांमध्ये ‘२६ जुलै, २००५’ आधीच उजाडला आहे. ...