नगर-मनमाड महामार्गावर अपघात, तीन ठार
नाशिक- नगर-मनमाड महामार्गावर ट्रक आणि इंडिका कारमध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास समोरासमोर भीषण टक्कर झाली. या अपघातात कारमधील हेमंत सोनी (34 रा. उदयपूर, राजस्थान), प्रकाश सोळंकी (25) मनोज पाटीदार (34) हे दोघे मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील रहिवाशांचा जागीच मृत्यू झाला.कारमधील प्रवासी शिर्डीकडे निघाले असताना हा अपघात झाला.येवल्याजवळ हा अपघात झाला. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य केले.अपघातात मृत्यू झालेले हेमंत सोनी हे उदयपूर उच्च न्यायालयात कार्यरत आहेत. येवला पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
