सिमेंट-काँक्रिटच्या जंगलात मुलांना खेळायला जागा नाही आणि घरातच आता कम्प्युटर, टेलिव्हिजन, प्ले स्टेशन अशी इतकी प्रलोभनं आहेत की, मुलांनाही मैदानी खेळ खेळण्यात फारसा रस नाही. पालकही आपला सोन्या घरीच शांत बसलाय हे पाहून सुखावतात. पण तो घरकोंबडा होतोय, चारचौघांमध्ये मिसळत नाही, त्याची चतुरस्त्र वाढ होत नाही, हे त्यांच्या ध्यानातही येत नाही. ‘चिंटू’ नेमका हाच मुद्दा मांडतो, पण मनोरंजक पद्धतीने.
कथेच्या पातळीवर ‘डिपार्टमेंट’मध्ये नव्याने सांगण्यासारखं काहीही नाही. राजकारणी आणि पोलिस यांच्यातील संबंध, पोलिसांमधलं आपसातलं राजकारण, साठमारी, गुन्हेगारी जगताशी पोलिसांचे आणि राजकारण्यांचे असलेले लागेबांधे, स्वार्थासाठी परस्परांना वापरण्याचे प्रकार हे सगळं रुपेरी पडद्यावर यापूर्वी अनेकदा दिसलंय. स्वत: रामूने ‘शिवा’पासून ‘अब तक छप्पन’पर्यंत या गोष्टींचे सगळे पैलू मांडून झालेत. त्यामुळे ‘डिपार्टमेंट’मध्ये त्याच्याकडे सांगण्यासारखं वेगळं काहीही नाही. ...
‘इश्कजादे’ पाचेक वर्षापूर्वी आला असता तर तो अधिक भिडला असता. त्यातली नॉव्हेल्टी व्हॅल्यू आता संपून गेली आहे. आता लक्षात राहते ती मुख्य जोडीतली केमिस्ट्री. ती पाहायची असेल तर वाट वाकडी करायला हरकत नाही....
‘अजिंठा’ बघताना दिग्दर्शकाचं अस्तित्वच जाणवत नाही. म्हणायला श्रेयनामावलीत दिग्दर्शक म्हणून नितीन चंद्रकांत देसाई हे नाव आहे. परंतु चित्रपटाची गत मात्र कप्तानाविना जहाज भरकटावं, तशी झालीय. ...
मराठी चित्रपटांमध्ये गेली काही वर्ष वेगळे प्रयोग होत असल्याचं म्हटलं जात असलं तरी ख-या अर्थाने ‘आउटस्टँडिंग’ म्हणता येईल, असा प्रयत्न झालेला नाही. काही अपवाद वगळता मराठी चित्रपट अजूनही ‘येड्यांच्या जत्रे’तच हरवलेला आहे. या पार्श्वभूमीवर असा एखादा चित्रपट यावा की, ज्याने विलक्षण उत्कट अनुभव द्यावा, ही गोष्ट दुर्मीळ आणि तेवढीच सुखद. हा सुखद धक्का महेश मांजरेकरांचा ‘काकस्पर्श’ देतो. ...
प्रियदर्शन दिग्दर्शित ‘तेज’ बघताना एक करायचं.. या कथेचा जो गाभा आहे, त्याच्यामागील तर्काकडे दुर्लक्ष करायचं. तसं केलं तर निव्वळ मनोरंजनाच्या कसोटीवर दोन तासांची ही रोलर कोस्टर राइड आवडण्याची शक्यता आहे....
एखादा चित्रपट देताना दिग्दर्शक हा एकच माणूस किती आणि कसा विचार करू शकतो, हे पाहून विस्मयचकित होण्याचे प्रसंग तसे क्वचितच. मात्र, विजू मानेच्या ‘खेळ मांडला’ पाहताना ही भावना वारंवार होत असते. प्रेक्षकांना पकडून ठेवणारी कथा आणि ती सादर करताना दाखवण्यात आलेलं माध्यमाचं गांभीर्य, हे सतत जाणवत राहतं. त्याची माध्यमावरची ही पकड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. ते या चित्रपटाचं महत्त्वाचं आकर्षण आहे. ...
कथेच्या पलीकडे जाऊन वैश्विक भाषा बोलणारा, सार मांडणारा चित्रपट भारतात अभावानेच बनतो, मराठीत तर हे प्रमाण त्याहून नगण्य आहे. उमेश, गिरीश सातत्याने असा सिनेमा बनवत आहेत. ‘मसाला’ही त्यातलंच आणखी एक यशस्वी पाऊल आहे....
हिंदी चित्रपटांमध्ये सेक्ससारख्या ‘टॅबू’ विषयाचा उल्लेख हल्ली हल्ली मोकळेपणाने होऊ लागला असला तरी सेक्सचा वापर प्रामुख्याने उत्तानपणाकडे झुकणारा असतो किंवा बॉइज कॉमेडी चित्रपटांसाठी तरी असतो....
महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या राजा शिवछत्रपतींवरील कुठलीही कलाकृती करणं हे आव्हानात्मकच असतं. मग ते पुस्तक असो, मालिका असो वा चित्रपट असो....