'रेस-2'मधून दिपीकाचा काढता पाय
मुंबई- दिग्दर्शक अब्बास मस्तानच्या 'रेस 2' या बहुचर्चीत चित्रपटाला निर्मितीकाळातच अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर मोठा गाजावाजा करत या चित्रपटाला होकार देणा-या दिपीका पदुकोणनेही आता अंतिम क्षणी काढता पाय घेतला आहे.चित्रीकरणाच्या वेळापत्रकात होणा-या सततच्या बदलामुळे दिपीका वैतागली असून त्यामुळेच तिने 'रेस-2'मध्ये काम करण्यास नकार दिल्याचे समजते. या चित्रपटामध्ये दिपीका सैफ अली खानसोबत दिसणार होती.
दिग्दर्शक अब्बास मस्तानी व सैफ दिपीकाचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र दिपीका तिच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. शिवाय अयान मुखर्जी यांच्या आगामी चित्रपटात ती रणबीरसोबत दिसणार असून या चित्रपटाचेही चित्रीकरण सुरु आहे. त्यामुळे दोन्ही वेळापत्रकांचा ताळमेळ न घालू शकत असल्याने दिपीकाने चित्रपटातून काढता पाय घेण्याच निर्णय घेतला आहे.
