२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेले निरापराध लोक आणि शहीद जवानांना गुरुवारी ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आणि मेणबत्ती व शांतता मोर्चाचे आयोजन करून आदरांजली वाहिली.
गेल्या वर्षीच्या ‘२६ नोव्हेंबर’ हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी मोहम्मद अजमल मोहम्मद आमिर कसाब उर्फ अबू मुजाहिद (२१) याच्याविरुद्धचा खटला पहिल्यापासूनच नाटय़मय ठरत आला आहे....
सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोरच महम्मद तौफीक शेख याचे चहाचे छोटे दुकान आहे. ‘छोटू चायवाला’ म्हणून परिसरात परिचित असणा-या महम्मदने २६/११ रोजी अनेकांचे प्राण वाचवले. कित्येकांचे मृतदेह उचलून हॉस्पिटलपर्यंत पोहचवले. त्याने त्या दिवशी दाखवलेल्या धाडसाचे रेल्वे अधिका-याऱ्यांनी कौतुक केले खरे, पण सरकारचे त्याच्याकडे दुर्लक्ष केले... ...
...तो माझ्यापासून १५ फूट अंतरावर होता. हातात बंदुक असती तर मीच कसाबला ठार केले असते आणि करकरे, कामटे आणि साळस्कर हे तीन हिरे आपल्याला गमवावे लागले नसते,...
त्यांनी मानवतेच्या भावनेने दिलेले बलिदान हे ‘अशोक चक्रा’साठी सरकारने स्मरणात ठेवणे गरजेचे होते. अशोक चक्रच्या कोणत्या निकषात आमचे पप्पा बसले नाहीत, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.. शहीद शशांक शिंदे यांची मुलगी आदितीची खंत.
...
रात्रीची ९.५५ ची वेळ. सीएसटी स्थानकात उतरणा-या शेकडो प्रवाशांसाठी काळरात्र ठरली असती पण मला कुठून प्रसंगावधान सुचले माहिती नाही..माझ्या डोळ्यादेखत शेकडो निष्पाप माणसांच्या प्राणांची आहुती पडली असती......
‘असं वाटतंय आज ते घरी येतील. रोज याच एका भावनेतून ओंबळे यांचे कटुंबीय आला दिवस घालवतात. मुलं लहान असोत वा मोठी वडिलांची वाट पाहायची सवय कधीच जात नाही. त्यांच्या पत्नीचे ताराबाईंचे डोळे तर आजही खिडकीकडे असतात.. मेंदूपर्यंत संवेदना पोहोचूनही मनाच्या कप्प्यात त्याला जागा मिळत नाही ती अशी..’ शहीद तुकाराम ओंबळे यांची मुलगी वैशाली हिने व्यक्त केलेल्या भावना.....
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचे गंभीर पडसाद नंतर विधिमंडळाच्या दोन्ही अधिवेशनात उमटले. गेल्या विधानसभेचे शेवटचे, हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १ डिसेंबर २००८ पासून होते. त्यासाठी सर्व यंत्रणा नागपूरला गेली होती. तिथली सरकारी कार्यालये आणि सरकारी निवासस्थानांत गर्दी झाली होती. सरकार नागपूरला अन् मुंबईत हा हल्ला, अशी परिस्थिती होती....
कसाबचे वकील अॅड्. अब्बास काझमी यांची मुलाखत...
...
विशेष सरकारी वकील अॅड्. उज्ज्वल निकम यांची मुलाखत......