नलिन भट्ट यांनाही एसआयटीचे समन्स
अहमदाबाद- गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या भीषण जातीय दंगलीचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठच नलिन भट्ट यांनाही समन्स बजावले आहे.
गुजरातच्या दंगलीच्यावेळी नलिन भट्ट हे भाजपचे सरचिटणीस होते. गुरुवारी विशेष तपास पथकाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही चौकशीसाठी पाचारण केले आहे.
