नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान शहीद
भुवनेश्वर- ओदिशामध्ये मलकानगिरी येथे शुक्रवारी संशयित माओवाद्यांनी केलेल्या ‘आयईडी’च्या शक्तीशाली स्फोटामध्ये सीमा सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले, तर दोन अधिकारी जखमी झाले.
आगामी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा प्रशासनाशी सुरक्षाविषयक तयारीबाबत बैठक आटोपून बीएसएफचे हे पथक एका जीपमधून परतत असताना त्यांच्या जीपला लक्ष्य करण्यात आले.
