डिजिटल बेस्ट की फिल्म या प्रश्नाचं उत्तर कुठलाही छायालेखक ‘फिल्म’ असंच देईल. पण येणा-या काळात डिजिटलला पर्याय नाही. याची अनेक कारणं आहेत.
डिजिटल की फिल्म, हा प्रश्न सध्या चर्चिला जात असला तरी ही दोन स्वतंत्र माध्यमं आहेत. त्यामुळे त्यांची तुलना करणं योग्य नाही. डिजिटलचे जसे गुणदोष आहेत, तसेच फिल्मचेही आहेत....
डिजिटल सिनेमा ही काळाचीच गरज आहे. येत्या काही वर्षात या तंत्राने मोठय़ा प्रमाणावर चित्रपटनिर्मिती होणार आहे. मात्र, केवळ पैसे वाचवण्यासाठी या माध्यमाचा वापर करू नये, असं माझं मत आहे....
‘आनंद’ चित्रपट संपतो तेव्हा पडद्यावर अक्षरे येतात. ‘आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं।’ 41 वर्षे उलटली, पण राजेश खन्नाचा आनंद आजही रसिकांच्या हृदयात जिवंत आहे....
माझी सुरुवात झाली ती अमॅच्युअर थिएटरपासून. त्यातून मी आंतरमहाविद्यालयीन, आंतरराज्य नाटय़ स्पर्धामधून कामं करायला सुरुवात केली. हळुहळू व्यावसायिक नाटकांमधून कामं करताना माझं मराठी रंगभूमीवर आणि तिथून पुढे हिंदी व गुजराती रंगभूमीवर कसं पदार्पण झालं ते कळलंच नाही....
‘बालाजी टेलिफिल्म्स’मध्ये अपरा मेहता या अभिनेत्रीचं पुनरागमन झालं आहे. पुनरागमनाचं निमित्त आहे ‘क्या हुआ तेरा वादा’ ही मालिका. या मालिकेत अपरा मेहता पंजाबी सासूची व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत.....
कुठलंही नाटक एका संस्थेकडून दुस-या संस्थेकडे जातं तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असतंच. कारण कुठलाही निर्माता आपलं चालणारं नाटक दुस-या निर्मात्याला स्वखुशीने देणार नाही. पण एखाद्या निर्मात्याचं चालतं नाटक, त्याची कितीही अडचण असली तरी दुस-या निर्मात्याने करणं कितपत योग्य आहे?...
बदल हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. निसर्ग असो की, मानवी भावभावना असोत, बदल होतच असतो. या बदलाचे बरेवाईट परिणाम टिपण्यासाठी आवश्यक आहे ती सजग दृष्टी. ...
ऑस्कर ज्वर आता वाढू लागलाय. ऑस्करमध्ये यंदा कोण बाजी मारणार, यावर पैजा लावण्यासाठी ऑस्कर पुरस्काराच्या आधी महिनाभर दिल्या जाणा-या पुरस्कारांमधून हॉट फेवरिटची निवड होते....
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. बहुआयामी पुलंचं एका शब्दात वर्णन करायचं तर त्यांना ‘खेळिया’ म्हणणं यथार्थ ठरेल. लेखन, संगीत, अभिनय, सादरीकरण, आकाशवाणी, चित्रपट, व्यवस्थापन इथपासून ते भारतातल्या पहिल्या दूरदर्शनसाठीचे प्रयत्न.. असा कोणताही कलाप्रांत नसेल जो पुलंनी अस्पर्श ठेवला. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर महाराष्ट्रातल्या पाच पिढय़ा सहज पोसल्या गेल्या आणि आजचा इंग्रजी माध्यमातला तरुणही त्यांच्या साहित्याने सहजच खुळावतो. याच पिढीसाठी लेखक-दिग्दर्शक क्षितीज झारापकर याने पुलंच्या साहित्यावर आधारित ‘गोळाबेरीज’ या सिनेमाची जुळणी केली आहे. त्यासाठी त्याने पुलंची विविध 27 पुस्तकं, पुलंनी जन्माला घातलेल्या असंख्य अजरामर व्यक्तिरेखा, तीन माहितीपट व त्यांच्याशी संबंधित पाच चित्रपट यांचा संदर्भ घेतला आहे. मराठीतले झाडून सर्व दिग्गज कलावंतांनी पुलंवरील प्रेमापोटी या ‘गोळाबेरीज’ला हातभार लावला आहे. हा महाकाय सिनेमा नेमका काय आहे आणि हे अवघड शिवधनुष्य कसं पेललं, या संदर्भात क्षितीजशी केलेली बातचीत.....