Home | साहित्य संमेलन

साहित्य संमेलन

बुद्धीभेदासाठी संमेलनाचा वापर करू नका!

समाजाचा बुद्धीभेद करण्यासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरू नये, असा दम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समारोपसमारंभात भरला.
Full story

बृहन्महाराष्ट्रीय जनतेच्या पाठीशी उभे राहा- कांबळे

महाराष्ट्राबाहेर राहणा-या मराठी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी संमेलनाच्या समारोपप्रसंगी केले. ...
Full story

वाचनालयांची सद्यस्थिती बदलण्याची गरज

वाचनालयांच्या दयनीय अवस्थेस कारणीभूत असलेल्या त्रुटी दूर केल्या, तरच त्यांना भरभराटीचे दिवस येतील, असा सूर वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी सार्वजनिक ग्रंथालये अपयशी ठरली आहेत का ?या विषयावरील परिसंवादात आळवण्यात आला....
Full story

संमेलनात अवतरले अस्सल 'नक्षत्रांचे देणे'

आनंदाचे डोही... निळ्या आभाळी कातरवेळी... येरे येरे घना... अशा वेचक गीतांची गुंफण साहित्य संमेलनाच्या दरबारात सादर करुन ठाणेकर अनघा ढोमसे हिने आपल्या चमूसह नक्षत्रांचे देणेच साहित्य रसिकांच्या ओंजळीत टाकले. ...
Full story

नैसर्गिक, ऐतिहासिक एकात्मतेचे ‘ठाणे’

ऐतिहासिक शहर, तलावांचे शहर, सांस्कृतिक शहर.. अशी अनेक वैशिष्टय़े ठाण्याची सांगितली जातात. ठाण्याची ही माहिती, इतिहास आणि सांस्कृतिक दर्शन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेकांना होण्यासाठी ‘ठाणे इतिहास व सांस्कृतिक दर्शन’ या दृक्श्राव्य कार्यक्रमातून त्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे...
Full story

जागतिकीकरणाचा परिणाम ग्रामीण जीवनशैली आणि भाषेवरही

ग्रामीण जीवनशैलीवर जसा जागतिकीकरणाचा परिणाम झाला आहे, तसाच तो ग्रामीण मराठी भाषेवर, बोलींवरही झाला आहे. बोलींमधले मौखिक साहित्य दुस-या पिढीपर्यंत झिरपण्याचा वेग प्रचंड क्षीण झालेला आहे, असा सूर ‘जागतिकीकरण, ग्रामीण समाज आणि मराठी भाषा’ या विषयावरील परिसंवादात होता. ...
Full story

कुणी निधी देता का निधी..

सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी साहित्य महामंडळाने सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले खरे, पण, मदतनिधीसाठी साहित्यनगरीत ठेवण्यात आलेल्या पेटीला अल्प प्रतिसाद लाभला....
Full story

मराठी चित्रपटाच्या समृद्धीसाठी पॅनेलची गरज

दिग्दर्शक, वितरक, निर्माता तसेच अन्य घटकांनी एकत्र येऊन मराठी चित्रपटाच्या समृद्धीसाठी ‘पॅनल’तयार करावे, असा सूर 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित केलेल्या ‘मराठी चित्रपटांची संख्या वाढली पण, दर्जाचे काय,’ या महाचर्चेतून निघाला. ...
Full story

बिनकागदांच्या पुस्तकांची रेलचेल

तंत्रज्ञानाच्या काळामध्ये पुस्तक आणि वाचनापासून तरुण दूर जात असल्याची भीती नेहमीच केली जात आहे. संगणक आणि इंटरनेटशी नाळ जुळल्यामुळे पुस्तके वाचण्यासाठी वेळ मिळत नसल्याची बाजू तरुणांकडून मांडली जाते. मात्र, या दोन्ही बाजूंवर सुवर्णमध्य साधत, या तरुणांसाठी नव्या माध्यमांतून प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आहे....
Full story

सिझर कर म्हणतेय माती..

‘सिझर कर म्हणतेच माती’ या काव्यसंग्रहाचे रविवारी निषाद देशमुख प्रकाशन कट्टय़ावर संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ...
Full story