पीटर ब्रुक, रिचर्ड शेखनेर आणि युजिनिओ बार्बा या त्रिमूर्तीचं एकत्रित रूप म्हणजे दुबे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आधुनिक भारतीय रंगभूमीला एक वेगळा आयाम देण्याचे काम करणा-या द्रष्टय़ा दुबेंना विविध मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
दुबेंच्या सगळ्या नाटकांची रचना वेगळी होती. आशय, अभिनय, शैली वेगळी होती. ती नाटकं त्यांनी ज्या पद्धतीने करून दाखवली तो या माणसाचा मोठेपणा होता. ...
एक मनस्वी कलाकार असलेल्या सत्यदेव दुबे यांनी 2004 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती...
मला असं वाटतं की दुबे हा मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीचा एक जबरदस्त स्त्रोत होता. ...
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी 11) पं. सत्यदेव दुबे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला. पण त्यानंतर दोनच दिवसांनी दुबे आजारी पडले. त्यामुळे 10 एप्रिल रोजी दुबे यांच्या जवळच्या काही मित्रमंडळींनी छोटंसं गेट टुगेदर ठेवलं. त्यात नसीरुद्दीन शाह, अमोल पालेकर, आकाश खुराना, सोनाली कुलकर्णी, दुबेंचे कॉर्डिऑलॉजिस्ट डॉ. देसाई असे बरेच लोक दुबेंबद्दल बोलले. ...
प्रायोगिक तसेच समांतर रंगभूमीचे अध्वर्यू ज्येष्ठ रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी सकाळी साडेअकरा वाजता निधन झाले....
‘‘अरे, यात माझा स्वार्थ आहे. तू सव्वीस वर्षाचा आणि मी साठीच्या जवळ पोचलोय. जग बघण्याच्या माझ्या शक्ता कमकुवत होत गेल्या आहेत. आज सव्वीस वर्षाच्या तरुणाच्या नजरेनं मला जग बघायला मिळत असेल तर ते मी का नको बघू? मला संजीवनी मिळाल्यासारखं होतं आणि तूच नाही, तुझ्या पुढच्या दोन पिढय़ांच्या लेखकांच्या नजरेनं जग बघायचीही मी तयारी ठेवली आहे.’’...