इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
बालेश्वर- भारताने शुक्रवारी सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची शुक्रवारी ओदिशा येथे यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताची संरक्षण ताकदीमध्ये वाढ झाली आहे.
चांदीपूर येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळावरून दहा वाजून 13 मिनिटांनी जमीनीवरुन जमीनीवर मारा करणा-या या क्षेपणास्त्राचे उड्डाण झाले. त्यानंतर त्यांनी ठरविक कालावधीत दिलेले लक्ष्य पूर्ण केले.
जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली असून पृथ्वी क्षेपणास्त्राच्या धर्तीवरच हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आल्याची माहिती संरक्षण खात्याने दिली. दूरचे लक्ष्य गाठण्याची तसेच एकाच वेळी अनेक ठिकाणे टिपण्यासाठी आणि आगामी क्षेपणास्त्राच्या पार्श्वभूमीवर या चाचणीला महत्त्व असल्याची माहिती संरक्षण खात्याच्या सूत्रांनी दिली.
इंटरसेप्टर मिसाईलची पहिली चाचणी सहा मार्च 2011 रोजी करण्यात आली होती.
