Home | क्रीडाजगत | युवराजचे फिजिओ बोगस?

युवराजचे फिजिओ बोगस?

नवी  दिल्ली-  भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला कर्करोग झाल्याचे स्पष्ट करणारे डॉक्टर जतीन चौधरी यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी नसल्याचा दावा मेडिकल कौन्सिलने केला आहे.

माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार मेडिकल कौन्सिलने चौधरी यांना आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास सांगितली होती, मात्र चौधरी ते देऊ शकले नसल्याचे कौन्सिलचे म्हणणे आहे.

 

मात्र चौधरी यांनी हे आरोप फेटाळून लावत आपण इटलीतील न्यू एज विद्यापीठातून पीएचडी केली असून सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, सानिया मिर्झा यासारख्या दिग्गज खेळाडूंवर उपचार केला आहे. शिवाय अखिल भारतीय फिजिओथेरिपिस्ट संस्थेमध्ये नोंदणीकृत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे आपण युवराजवर फिजिओथेरिपिस्ट म्हणून उपचार करतो कॅर्करोगासाठी नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

 

युवराज सिंग याला कॅन्सर झाल्याचे युवराजचे फिजिओ जतिन चौधरी यांनी सांगितले होते. शिवाय त्याचा कॅन्सर गंभीर नसल्याचेही त्यांनीच स्पष्ट केले होते.

 

सध्या त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरु असून, केमोथेरपी करण्यात आली आहे. युवराजवर मार्चपर्यंत आणखी उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील सहा महिने तरी युवराज क्रिकेट खेळू शकणार नाही.