केस गेले तरी मी कणखर आहे-युवराज
नवी दिल्ली- ''केस जरी गेले असले तरी मी हार मानलेली नाही. मानसिक दृष्ट्या कणखर आहे'' असे युवराजने नमूद करत त्याने आपले छायाचित्रही ट्विटरवर टाकले आहे. भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याच्यावर केमोथेरपी थेरेपीमुळे त्याच्या डोक्यावरचे सर्व केस गेले आहेत.
''अखेर... माझ्या डोक्यावरील केस गेलेच. परंतु, मी मानसिक दृष्ट्या अत्यंत कणखर आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीला मी धीराने सामोरे जात आहे '' असेही ट्विट केले आहे.भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू असलेल्या युवराजला कर्करोग झाल्याचे कळल्यानंतर क्रिकेटप्रेमी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
