सुवर्णमुद्रा
सांस्कृतिक धोरणाची दिशा हवी प्रगल्भ समाजनिर्मितीची
शालेय वयापासूनच मुलांना साहित्य, नाट्य, संगीत, चित्र-शिल्प, चित्रपट आदी कलांची गोडी लागावी म्हणून अभ्यासक्रमांची पुनर्रचना करायला हवी. शालेय वयात नीट सांस्कृतिक पोषण झाले, सांस्कृतिक जाणिवा विकसित झाल्या, तर भविष्यात एका प्रगल्भ समाजाची निर्मिती होऊ शकते. सांस्कृतिक धोरणाची दिशा तशी असायला हवी.
