वाचकांच्या कॅमे-यातून
फुलांचे विविध रंग, गंध, प्रकार पाहिले की, सृष्टीच्या अनोख्या विविधतेबद्दल खात्री पटते. आकर्षक अशा फुलांच्या दर्शनाने मन प्रफुल्लित होतं. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी प्रेमीयुगुलं, भक्ती व्यक्त करण्यासाठी भक्त तसंच एखाद्याचं स्वागत करण्यासाठी फुलांचा उपयोग होतो. जांभळय़ा रंगाचं हे सुंदर फूल कॅमे-यात टिपलंय विनायक मोरे यांनी.
