Home | व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल | ख्वाइशें अपनी अपनी

ख्वाइशें अपनी अपनी

तो...
  •  माझ्यापेक्षा जास्त हुशार नको हं.. माझं कौतुक व्हायला हवं.
  •  मला समजून घेणारी हवी
  •  थोडय़ा थोडय़ा गोष्टींवरून रागावणारी. म्हणजे अगदीच जगदंबा नको. पण लाडिक रुसवा काढण्यात गंमत आहे.
  •  आगाऊ, हट्टी, स्वार्थी पण माझं ऐकणारी
  •  मला दुसरी मुलगी आवडली तर तिच्यासोबत फ्लर्ट करू द्यायला हवंय
  •  आठवडय़ातून चार वेळा तरी तिने माझ्यासोबत फिरायला बाहेर यायला हवं.
  •  मी स्मोक करताना तिने तोंड न फिरवता माझ्याकडे हसत (प्रेमाने, कौतुकाने) पाहायला हवं.
  •  भरपूर बोलणारी हवी. पण अगदीच रेकॉर्ड नको. त्याचवेळी सेंटर फ्रेश (जुबाँ को लगाम) हवाच.
  •  बहनजी टाइप कपडे घालणारी नको. जीन्स, टाइट्स घालायला हव्यात.
  •  मला बंधनात ठेवायचा प्रयत्न करणारी नको. मला माझी स्पेस हवी आहे.
  •  मी सोडून बाकी सगळ्यांची बहीणअसायला हवी.
  •  माझ्या प्रत्येक एसएमएसचं तिने उत्तर दिलं पाहिजे.
  •  किमान कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवावा! प्रत्येक वेळी तू खोटंच बोलतोस म्हणून भांडायची काय गरज आहे?
  •  मित्रांसोबत पार्टीला जाण्यापासून अडवायचं नाही
  •  रूल बुकबनू नये. सतत नियम शिकवणारी नको.
  •  बाइकवर बसताना तिने एकीकडे पाय टाकून बसायला नकोय. दोन्हीकडे पाय टाकून बसायला हवं
 ती...
  •  त्याने सर्वाधिक माझ्यावर प्रेम करावं. दुस-या कुठल्या मुलीकडे पाहायचं नाही
  •  स्मोक करणारा नसावा. असलाच त्याने कानातून, नाकातून धूर काढला पाहिजे. रिंगही काढल्या पाहिजेत.
  •  डिझास्टर नको.जरा ड्रेसिंग आणि स्वच्छतेचं भान असावं. अगदीच ध्यान नको.
  •  त्याने आपली हेअरस्टाइल, लुक्स सतत बदलले पाहिजेत. ट्रेंडी दिसायला हवा.
  •  मी सांगेन त्याच रंगाचे आणि तसेच कपडे घातले पाहिजेत.
  •  रोज एक कॅडबरी, रेड रोझ द्यायला हवं. थोडक्यात, आमचा प्रत्येक दिवस व्हॅलण्टाइन डेच असावा.
  •  त्याने मला सकाळी, दुपारी, संध्याकाळी स्वत:हून फोन केला पाहिजे.
  •  सॅटेलाइटसारखा मागे मागे फिरणारा नसावा
  •  त्याला राजकारणातलं उत्तम समजलं आणि आलं पाहिजे.
  •  माझ्यासाठी फिल्मी स्टाइलमध्ये गाणं म्हटलं पाहिजे.
  •  नवीन आलेले सिनेमे न सांगता दाखवले पाहिजेत.
  •  भेटेल तेव्हा पाणीपुरी, कच्चीकैरी खिलवायला हवा.
  •  मला दररोज घ्यायला आणि सोडायला घरी यायला हवं.
  •  माझं जितकं ऐकेल तितकंच माझ्या आई-बाबांचंही ऐकायला हवं.
  •  माझ्या मित्रांसोबत बोलण्यापासून मला रोखायला नको.
  •  मालकीहक्क दाखवू नये.
  •  माझ्या मोबाइलचा बॅलन्स त्याने भरावा. पॉकेटमनीमधले थोडेतरी पैसे त्याने माझ्यासाठी राखून ठेवायला हवेत.