आशा खेमका यांना ‘ओबेई’ पुरस्कार
लंडन - ब्रिटनमधील शिक्षणक्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘ओबेई’ पुरस्कार यंदा भारतीय वंशाच्या शिक्षणतज्ज्ञ आशा खेमका यांना मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणा-या त्या आशियातील पहिल्या महिला प्राचार्या आहेत.
‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ असे या पुरस्काराचे नाव असून त्यांनी गेल्या आठवडय़ात इंग्लंडच्या सम्राज्ञीकडून स्वीकारला. ‘हा पुरस्कार मिळाल्याने मी खूपच भारावले आहे. या पुरस्काराचा मला अभिमान वाटतो. भारतातून येथे आलेल्या मला हा इतकी मोठी मजल मारता येईल, याची कल्पना नव्हती,’ असे मत खेमका यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केले. खेमका या वेस्ट नॉटिंगहॅमशायर महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच मुख्य कार्यकारी म्हणून काम पाहत आहेत.
