07 October, 2010 07:30:00 AM
मैत्रिणींची एका निमित्तानं भेट, सर्वाना चालीवर आणि ठसक्यात म्हणता येणारी गाणी आणि नंतर खिरापत.. यासाठी भोंडला आजही हवाहवासाच वाटतो! मुंबई-कोकणात नवरात्राचे नऊही दिवस खेळल्या जाणाऱ्या या भोंडल्याची रूपं मात्र लोकलगाडीतला भोंडला किंवा उपनगरांमधल्या ‘महाभोंडला’पर्यंत बदलत गेली..
30 September, 2010 07:40:00 AM
स्त्री असो वा पुरुष.. कोणालाही आपली त्वचा सुंदर, कांतिमान असावी, असं वाटण्यात गैर काहीच नाही. धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कटाक्षाने त्वचेची काळजी घेणं जमतंच असं नाही. थोड्या प्रयत्नाने आपण त्वचेला उजळा देऊ शकतो. ...
30 September, 2010 07:15:00 AM
मुंबईत गेल्या दोन ते तीन पिढ्या डेटिंग करत होत्या, असा या शहराचा इतिहास आहे. प्रेमालापाच्या ठरलेल्या जागांवर बंधनं आल्यामुळे त्या नाहीशा झाल्या, म्हणून अलीकडे गल्लीबोळांत ‘फोर व्हीलर डेटिंग’ सुरू झालं. आधीच्या पिढीतल्या मुली चुकल्याही असतील, पण म्हणून आजच्या मुलींना डेटिंग किती मर्यादेपर्यंत ठेवायचं, हे माहीत नसणारच, असं का समजायचं? ...
16 September, 2010 04:30:00 AM
शाळा-कॉलेजात असताना ज्या घरच्या ‘गणपतीचा जयजयकार’ केला, त्याचं लग्नानंतर फक्त पाहुण्यासारखं दर्शनच घ्यायचं? गणपती सासरी बसतो आणि माहेरीसुद्धा, म्हणजे दोन्ही आपलेच. पण माहेरच्या गणपतीची, माणसांची, वातावरणाची ओढ असतेच ना? मग कशी करायची ही कसरत? काय करतात मैत्रिणी?...
09 September, 2010 04:50:00 AM
गणपतीचं सान्निध्य असलेल्या तीनच स्त्रिया. विविध रूपांमध्ये वावरणारी त्याची आई-पार्वती आणि त्याच्या दोन बायका-सिद्धी आणि बुद्धी. पण कथांमधून, उत्सवांतून आठवण काढली जाते ती त्याच्या आईचीच. त्याच्या पत्नींच्या कथा काय आहेत, त्यांचं काय झालं? हे कळत नाही.. असं का व्हावं?
...
02 September, 2010 06:00:00 AM
गेल्या काही वर्षापासून स्त्रियांचे केस कापणाऱ्या पुरुष हेअरड्रेसर्सची संख्या वाढू लागली आहे. हे क्षेत्र मुळात स्त्रियांचंच, त्यामुळे या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी पुरुष हेअरड्रेसरना स्ट्रगल करावा लागला. त्याचबरोबर, आजच्या महिलांना स्वत:चा लुक कसा हवा हे कळतं आणि तो कुणी बदलला यापेक्षा किती कौशल्यानं बदलला गेला याकडे त्या लक्ष देतात, त्यामुळे या क्षेत्रातला स्त्री-पुरुषभेद मावळत जाऊ शकतो!
...
26 August, 2010 05:05:00 AM
मुंबापुरी आणि ठाणे नगरीसह अवघा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहतोय तो गोकुळाष्टमीच्या दुस-या दिवशी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाची. ठिकठिकाणची छोटी-मोठी दहीहंडी पथकं गेल्या महिनाभरापासून मानवी मानोरे रचण्याचा सराव करत आहेत. यात गोपिका पथकंही मागे नाहीतच. महिलांच्या शक्ती-युक्तीचा आणि संघटितपणाचा हा उत्सव ठरतो आहे.. ...
19 August, 2010 05:10:00 AM
बदलत्या काळात सणांचं स्वरूप बदलत चाललं आहे. मंगळागौरीचंही तसंच काही. पूर्वी लग्नानंतर पाच वर्ष मोठय़ा थाटात साजरी होणारी मंगळागौर आता जेमतेम लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी साजरी होते. अनेक घरांमध्ये एकुलता एक मुलगा-मुलगी असल्याने तिथे वर्षानुर्वष मंगळागौर होण्याची शक्यताच नाही. अशा वेळी ही कुटुंबं नेमकं काय करतात?...
12 August, 2010 06:15:00 AM
साप दिसला की बाईनं किंचाळायचं, सापाचं नाव निघताक्षणी ‘ईऽऽ गिळगिळीऽत’ म्हणून नाक मुरडायचं किंवा सापाबद्दलच्या अंधश्रद्धा तिनं पुढे न्यायच्या.. हे सगळं नागपंचमीनिमित्त तुमच्या डोळ्यासमोर असल्यास शेजारच्या फोटोतला माया भिसेचा चेहरा आणि आत्मविश्वास नीट पाहून घ्या! सध्या ती महाराष्ट्रातली एकमेव ‘सर्टिफाइड’ सर्पमैत्रीण आहे आणि सर्पमैत्रिणींची संख्या नक्की वाढू शकते, असं तिला वाटतंय.. ...
29 July, 2010 04:50:00 AM
‘कोच’ आणि ‘काउच’च्या दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे हतबलतेचं. पुढे जायचं असेल तर तुम्हाला तडजोड करावीच लागेल, हा संकेत यातून मिळतो. ‘कोच’ने रंजीताच्या चारित्र्यावर चिखलफेक केली. त्यावेळी तिच्या पाठीशी सगळ्या मुली उभ्या राहिल्या, पण ‘काउच’च्या प्रकरणात त्या मुलींच्या पाठीशी कुणीही उभं राहिलं नाही. समाजाच्या नजरेचे वार झेलणा-या या मुलींना आपलाच गुन्हा आहे, असं वाटू लागलं. त्यामुळे आधीच खेळणा-या मुलींची कमी होणारी संख्या रोडावण्याची शक्यताही फेटाळता येत नाही....