मुक्ता
आला पावसाळा, आरोग्य सांभाळा
22 June, 2009 07:35:00 AM
उशिरा का होईना हजेरी लावलेल्या वर्षाऋतूचं स्वागत थोडं सावधानतेनेच करायला हवं. कारण आता वातावरण बदलेल तसं रोगराईलाही आमंत्रण मिळेल. मन रिझवणाऱ्या, भिजवणा-या पावसाचा मनमुराद आनंद लुटायचा तर ‘आला पावसाळा.. आरोग्य सांभाळा..’ या उक्तीनुसार आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
अवघे एकशे वयमान...
17 June, 2009 06:57:00 PM ‘सर्वाधिक प्रगत मानला जाणारा मानवी मेंदू दोन भागांमध्ये विभागलेला आहे. एक भाग भावनांना कारण ठरतो. तर दुसरा भाग विवेकाला. अलीकडच्या काळात भावनांना कारणीभूत असलेल्या भागाचा प्रभाव वाढला आहे आणि जगातील वाढत्या समस्यांचे मूळ यातच आहे. वाढता हिंसाचार, दहशतवाद हे याचंच प्रतिबिंब नव्हे का?’ ...अनंत माझी ध्येयासक्ती...
16 June, 2009 05:37:00 PM अश्विनीला जन्मानंतर सहाव्या महिन्यात पोलिओ झाला. ती चालायला लागली ते कुबडय़ा हाती घेऊनच. माध्यमिक शिक्षणासाठी नवीन शाळेच्या शोधात असतानाच तिच्यावर ‘पोलिओ करेक्टिव सर्जरी’ करण्यात आली. उपचारादरम्यान हॉस्पिटलच्या नर्सेस, डॉक्टर्सना न्याहळताना, आपणही डॉक्टरच व्हायचं, हे ध्येय तिनं मनाशी बाळगलं आणि प्रत्यक्षात उतरवलंदेखील....मेकअप इन टू मिनिट्स
16 June, 2009 07:40:00 AM कार्यक्रमाला जाण्याची घाई आणि तयारीसाठी कमी वेळ असाताना दोन मिनिटांत मेकअपसह तयार होण्यासाठी टिप्स...सडसडीत!
16 June, 2009 07:30:00 AM व्यायामादरम्यान झालेली स्नायुपेशींची हानी भरून काढण्यासाठी शरीरात साठलेल्या चरबीचा भरपूर वापर होतो. परिणामस्वरूप चरबी कमी होत जाते आणि आपण सडसडीत दिसायला लागतो. अर्थात, त्यासाठी व्यायामात सातत्य असावं लागतं. शरीर वाढताना आणि कमी होतानाही ते सर्वागांनी होतं, हे समजून घेतलं पाहिजे....मुखकर्करोगापासून सावधान
14 June, 2009 10:17:00 PM आपल्या देशात ग्रामीण तसंच शहरी भागातही मोठय़ा प्रमाणावर अनेक स्वरूपात तंबाखूचं सेवन केलं जातं. विडी, सिगारेट, पान, सुपारी, मशेरी आणि तपकीर यातील तंबाखूचा अंश शरीराला घातक ठरतो. तंबाखूच्या सततच्या सेवनामुळे मुखकर्करोगाला आमंत्रण मिळतं....पावसाळ्याच्या उंबरठ्यावर
14 June, 2009 10:28:00 PM ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे..!’ असं समर्पक शब्दांत कवीने ऋतूंचं कौतुक केलं आहे. पण या मुख्य ऋतूंपेक्षाही ऋतुबदलाच्या संधिकालात अनेक रोग संधिसाधूपणा करतात. नुकत्याच सरलेल्या (?) तीव्र उन्हाच्या तडाख्याने मुंबईकरांना गारद केले. मलेरिया, स्वाईन फ्ल्यू, उष्माघात, गोवर, कांजिण्या, घशाचा संसर्ग, वारंवार येणारा खोकला अशा अनेक आजारांचे हल्ले झाले. पण या केवळ ‘चकमकी’ वाटाव्यात अशा प्रमाणात आजारांची भावी युद्धाची चाहूल पावसाळ्याच्या उंबरठय़ावरच लागते. तेव्हा वेळीच सावधान होणं आवश्यक आहे. ऋतुसंधीच्या या काळात साथींचे अनेक आजार बळावतात. ...पारंपरिक साड्यांच्या दुनियेत
12 June, 2009 07:45:00 AM पारंपरिक पोशाख असणा-या साडीचं भारतीय स्त्रियांच्या मनातील स्थान बदलत्या काळातही कायम आहे. हा पोशाख स्त्रीचं सौंदर्य विशेष खुलवतो. ‘स्मार्ट बाय’च्या या भागात आपण दक्षिण भारतातील पारंपरिक साडय़ा पाहणार आहोत....आशेचं बळ
11 June, 2009 07:40:00 AM स्वाती सावंत आठवतेय? बरं, पराग सावंत किती जणांना आठवतो? २००६ साली मुंबईतल्या उपनगरी गाडय़ांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये जखमी अवस्थेत सापडलेल्या आणि अगदी अजूनपर्यंत कोमामध्ये असलेल्या दोन तरुणांपैकी एक. हिंदुजा रुग्णालयात आजही त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आठवलं? दरवर्षी बाँबस्फोटांचा तो काळाकुट्ट दिवस आला की राजकीय नेते त्याला भेटायला जातात आणि बाहेर येऊन मग मीडियासमोर सरकारला नावं तरी ठेवतात किंवा सांत्वनाचे अश्रू तरी ढाळतात. तोच तो पराग सावंत. ही कथा त्याची नाही तर ती आहे त्याची पत्नी, स्वातीची....मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य