13/7 स्फोटांचे लादेन कनेक्शन
मुंबईत 13 जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेशी थेट अल- कईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनाचाच संबंध होता, अशी माहिती समोर आली आहे
मुंबई- मुंबईत गेल्या वर्षी 13 जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेशी थेट अल- कईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनाचाच संबंध होता, अशी माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी अटकेत असलेला हारुन रशीद अब्दुल हमीद नाईक याने ऑगस्ट-2001 मध्ये कंदहार येथील अल-कईदाच्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात लादेनची भेट घेतल्याची धक्कादायम माहिती समोर आली आहे.
इंडियान मुजाहिदिनचा सदस्य असलेला हारुन 9/11 स्फोटातील आरोपी असलेल्या अफताब अन्सारी आणि शेख उमरच्या सतत संपर्कात होता. कंदहार येथे 40 दिवसांच्या दहशतवादी प्रशिक्षणासाठी तो गेला होता आणि त्यासाठी त्याला शेख उमरने मदत केली होती. या प्रशिक्षण केंद्रात एके दिवशी सायंकाळी लादेन आला होता, त्याचवेळी हारुनची त्याच्याशी भेट झाली होती. लादेनने त्यावेळी अरबी भाषेतून चितावणीखोर भाषणही केले होते. कॅम्पमध्ये उपस्थित असलेल्यांना माहिती देण्यासाठी खास लादेनने एक भाषांतरकार नेमला होता. हा भाषांतरकार लादेनचे भाषण हिंदी, इंग्रजी भाषेतून सांगायचा. या कॅम्पमध्ये अनेक परदेशी नागरिकांनीही प्रशिक्षण घेतले होते. कंदहार येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर हारुनला पाकिस्तानात जाण्यासाठी आसिफ राजा आणि रियाझ भटकळने मदत केली होती.
मुंबईवर करण्यात आलेल्या 9/11 च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बहावलपूर येथील दहशतवादी प्रशिक्षण केंद्र सोडण्याच्या सूचना दहशतवाद्यांना देण्यात आल्या होत्या. शेख उमर हा एलएटी, जैश-ए-मोहम्मद, इंडियन मुझाहिदिन या संघटनेचा सदस्य आहे. कंदहार येथे विमान अपहरणात सूटका झालेल्यांपैकी शेख उमर हा एक आहे. अफताब अन्सारी याने अमेरिकन कौन्सिलेटवर गोळीबार करून काही नागरिकांना अपहरण केले होते.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा