‘पॅकेज पत्रकारिते’ची चौकशी व्हायला हवी
विधानसभा निवडणुकीत वर्तमानपत्रांनी केलेल्या ‘पॅकेज पत्रकारिते’ने ज्येष्ठ पत्रकार आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक गोविंद तळवलकर व्यथित झाले असून या घृणास्पद प्रकाराची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वर्तमानपत्रांनी केलेल्या ‘पॅकेज पत्रकारिते’ने ज्येष्ठ पत्रकार आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक गोविंद तळवलकर व्यथित झाले असून या घृणास्पद प्रकाराची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
‘पॅकेज पत्रकारिते’वर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी लिहिलेला एक लेख वाचल्यानंतर तळवलकर यांनी आपल्या एका सहकाऱ्याला पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ६० वर्षाच्या कारकीर्दीत मराठी पत्रकारितेची इतकी लांच्छनास्पद अधोगती झाल्याचे कधी पाहिले नव्हते.Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (1 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा