PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: ‘पॅकेज पत्रकारिते’ची चौकशी व्हायला हवी ‘पॅकेज पत्रकारिते’ची चौकशी व्हायला हवी ================================================================================ प्रतिनिधी on 29 October, 2009 09:30:00 AM मुंबई- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वर्तमानपत्रांनी केलेल्या ‘पॅकेज पत्रकारिते’ने ज्येष्ठ पत्रकार आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक गोविंद तळवलकर व्यथित झाले असून या घृणास्पद प्रकाराची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ‘पॅकेज पत्रकारिते’वर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी लिहिलेला एक लेख वाचल्यानंतर तळवलकर यांनी आपल्या एका सहकाऱ्याला पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ६० वर्षाच्या कारकीर्दीत मराठी पत्रकारितेची इतकी लांच्छनास्पद अधोगती झाल्याचे कधी पाहिले नव्हते.