पहिले पान | महामुंबई | शुक्रवारी सापडले १५१ मद्यपी चालक

शुक्रवारी सापडले १५१ मद्यपी चालक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

दारूच्या नशेत बेभानपणे गाडी चालवून फौजदारासह एका दुचाकीस्वारास नुरीया हवेलीवाला या तरुणीने चिरडले, त्या शुक्रवारी रात्री दारू पिऊन गाडी चालवणा-या १५१ चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली.

मुंबई- दारूच्या नशेत बेभानपणे गाडी चालवून फौजदारासह एका दुचाकीस्वारास नुरीया हवेलीवाला या तरुणीने चिरडले, त्या शुक्रवारी रात्री दारू पिऊन गाडी चालवणा-या १५१ चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली. यातील ६७ चालकांना एक ते पाच दिवसांची कैद झाली असून ७६ जणांना न्यायालयात दुस-या दिवशी बोलावले होते. या शिवाय ५८ जणांचा वाहन चालवण्याचा परवानाही निलंबित करण्यात आला.

 

अपघातानंतर पोलिस कोठडीत असलेल्या नुरीयाच्या रक्ताचे नमुने न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अपघात झाला. त्या वेळी तिने अन्य अमली पदार्थाचेही सेवन केले होते की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. हा अहवाल आठवडाभरात येणे अपेक्षित असल्याचे जी. टी. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. नुरीयाने रविवारी पोटदुखीची तक्रार केल्यानंतर तिची रुग्णालयात चौकशी करण्यात आली.

 नुरीयाच्या वडिलांनी मात्र नुरीयाने प्रमाणाबाहेर मद्यप्राशन केले होते, या पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.  नुरीया ४५० मिली दारू प्यायली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण ४३० मिली इतकी दारू प्यायल्यावर एखाद्या व्यक्तीची शुद्धच हरपते किंवा शुद्ध हरपण्याच्या मार्गावर ती व्यक्ती जाते. पण नुरीया उंच टाचांची पादत्राणे घालूनही व्यवस्थित चालत होती. त्यामुळे पोलिसांकडील ब्रेथ अ‍ॅनालायझरमध्येच काही तरी दोष असावा, असा दावा तिच्या वडिलांनी केला. नुरीयाच्या गाडीचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. नुरीयाच्या आईनेही तिने दारू प्यायली असावी, पण प्रमाणाबाहेर नाही, असे सांगितले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0