PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 01 February, 2010 10:55:00 AM मुंबई- सांताकूझ पश्चिमेला एमएमआरडीएच्या स्काय वॉकचे काम सुरू असताना रविवारी सकाळी महापालिकेची पाइपलाइन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले. जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदार कंपनीला या ठिकाणचे काम देण्यात आले होते. स्टेशन रोडवर असणा-या पोद्दार शाळेसमोर महापालिकेची ६ इंच व्यासाची पाइपलाइन आहे. महापालिका आयुक्त तसेच एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी या घटनेला दुजोरा दिला असून या प्रकरणी दोषी आढळल्यास कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याचे सूतोवाच केले. दरम्यान, माटुंगा येथील किंग्ज सर्कल उड्डाणपुलाखालीही अशाच तऱ्हेची दुर्घटना घडली. कपोल निवाससमोर उड्डाणपुलाच्या पिलरचे बांधकाम सुरू असताना खड्डे खोदले आहेत. त्यामुळे ३२ इंच व्यासाच्या भूमिगत पाण्याच्या पाइपलाइनला गळती लागली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणीही जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर हीच कंत्राटदार कंपनी काम करते. पाइपलाइनच्या गळतीचा शोध घेऊन तात्काळ उपाययोजना करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएने दिली.