पहिले पान | महामुंबई | सैफ-कतरीना शोषित महिलांच्या पाठीशी

सैफ-कतरीना शोषित महिलांच्या पाठीशी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

प्रसारमाध्यमे, आदरातिथ्य, आयुर्विमा, बांधकाम व्यवसाय आदी क्षेत्रात अग्रेसर असणा-या ‘पर्ल्स’ या उद्योगसमूहाने समाजातील शोषित, वंचित स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी ‘वेव्ह’ या सामाजिक संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

मुंबई- प्रसारमाध्यमे, आदरातिथ्य, आयुर्विमा, बांधकाम व्यवसाय आदी क्षेत्रात अग्रेसर असणा-या पर्ल्स या उद्योगसमूहाने समाजातील शोषित, वंचित स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी वेव्ह या सामाजिक संस्थेची स्थापना करण्याची घोषणा शनिवारी येथे केली. या वेळी सिनेसृष्टीतील सैफ अली खान, कतरीना कैफ, हरमन बावेजा आदी कलाकार उपस्थित होते.

 

भारतात तीनपैकी एका महिलेस कौटुंबिक अत्याचारास सामोरे जावे लागते. एकीकडे आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहतो पण आपल्याच देशातील महिला आज असुरक्षित आहेत हे खेदजनक आहे. अशा महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्यावर अत्याचार करणा-यांना इशारा देण्यासाठी आम्ही संस्था स्थापन करत आहोत, असे पर्ल्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष ज्योतीनारायण यांनी स्पष्ट केले.

 पर्ल्सच्या उपक्रमास पाठिंबा देण्यासाठी सैफ अली खान, कतरीना कैफ, हरमन बवेजा हे कलावंत आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी सैफ म्हणाला की, समाजाने आम्हा कलावंतांना भरभरून दिले आहे, त्या कृतज्ञतेच्या भावनेतून आम्ही या उपक्रमात सहभागी झालो आहोत. तर कतरीनाने सांगितले की, तिची आई लहान मुलांच्या कल्याणासाठी झटणा-या संस्थेला मदत करते. आईकडून मिळालेल्या प्रेरणेतूनच मीही वेव्हच्या माध्यमातून शोषित महिलांच्या पाठीशी उभी राहीन. येत्या 20 फेब्रुवारीला पर्ल्स उद्योगसमूहातर्फे एमएमआरडीए मैदानावर नारीशक्तीला सलाम करण्यासाठी विविध क्षेत्रातील दहा महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0