PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: एअरटेलच्या गॅलरीची मनसेकडून मोडतोड एअरटेलच्या गॅलरीची मनसेकडून मोडतोड ================================================================================ प्रहार वार्ताहर on 09 March, 2010 02:45:00 PM ठाणे- मोबाइल फोनवरील घोषणा मराठीतून देण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील एअरटेलच्या मोडतोड केली आहे. ठाण्यातील नौपाडा भागातील एअरटेल गॅलरीची मनसे कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. मोबाईल फोनवरील घोषणा मराठीतून देण्यात याव्यात असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु त्यानंतरही एअरटेल कंपनीच्या घोषणा मराठीतून दिल्या जात नसल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी गॅलरीची मोडतोड केली.