PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: 26/11 खटल्याच्या सुनावणीस गृहमंत्री उपस्थित 26/11 खटल्याच्या सुनावणीस गृहमंत्री उपस्थित ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 09 March, 2010 04:00:00 PM मुंबई- मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीस मंगळवारी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आणि गृहराज्यमंत्री रमेश बागवे न्यायालयात उपस्थित होते. साधारण दीड तास न्यायालयात उपस्थित राहून सरकारी पक्षाचा युक्तीवाद त्यांनी ऐकला. त्याचप्रमाणे त्यांनी विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांच्यासोबत चर्चा केली व खटल्याच्या सद्यस्थितीबद्दल माहिती घेतली. या खटल्याच्या अंतिम युक्तीवादाला विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी आरंभ केला आहे.