पालिकेतील सत्ताधा-यांचाच पाणीचोरीत हात
ज्यांच्यावर पाणीचोरी रोखण्याची जबाबदारी आहे त्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे शाखाप्रमुखच पाणीचोरी करीत आहेत. याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत बुधवारी केला.
मुंबई- ज्यांच्यावर पाणीचोरी रोखण्याची जबाबदारी आहे त्या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे शाखाप्रमुखच पाणीचोरी करीत आहेत. याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत बुधवारी केला.
पाणी गळती आणि पाणीचोरीला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा असताना तुम्ही स्वतंत्र यंत्रणा का उभी केली, असे विचारले असता नितेश राणे म्हणाले की, महापालिकेतील शिवसेनेचे सत्ताधारीच पाणीचोरी करत आहेत. माहीम येथील शाखा क्रमांक १८३ मध्ये शाखाप्रमुख अशोक नाईक आणि चेंबूर येथील शाखा क्रमांक १४३ चे शाखा प्रमुख महेंद्र नगाटे यांनी अनधिकृतपणे पाणी जोडणी घेतली असल्याचे नितेश राणे यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले. या दोन्ही वॉर्डाचे नगरसेवक अजित पंडित आणि जयश्री खरात हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यांच्या आशीर्वादाने ही पाणीचोरी राजरोस सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकच अशी पाणीचोरी करू लागले तर पाणीचोरीला आळा घालण्यासाठी त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा प्रश्नही त्यांनी केला.
मध्यमवर्गीय वस्त्या, झोपडपट्टय़ांत राहणाऱ्यांना १० ते १५ मिनिटेही पाणी मिळत नाही, मात्र टॉवरमधील गर्भo्रीमंतांना चोवीस तास पाणी मिळते, हा दुजाभाव का, असा सवाल करत नितेश राणे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेचे पाणी वितरणावर नियंत्रण नाही. त्यामुळेच मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठय़ापैकी २२ टक्के पाणी गळती होऊन अथवा चोरी होऊन वाया जात आहे. चोरी होणाऱ्या पाण्याला आळा घालण्यासाठी आता स्वाभिमान संघटनेने कंबर कसली असून पाण्याची चोरी होत असल्याचे आढळून आल्यास आम्हाला कळवा, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबईतील पाणी प्रश्न सुटावा एवढीच आपली तळमळ असून त्यासाठीच आम्ही हे मिशन हाती घेतले आहे. आता महापालिकेच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत, वेळ पडल्यास यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे याकडे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाण्यासाठी सर्वानी एकत्र यायला हवे
जलवाहिनी फोडणा-यांना फोडून काढा, असा आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच दिला. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता नितेश राणे यांची प्रतिक्रिया ‘देर आये दुरुस्त आये’ अशी होती. त्यांचा राजकीय पक्ष आहे; पण, पाणीचोरीच्या प्रश्नावर सर्वानीच एकत्र यायला हवे, अशी अपेक्षाही नितेश राणे यांनी व्यक्त केली.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा