PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: छोटा पांडे सीबीआयच्या हवाली छोटा पांडे सीबीआयच्या हवाली ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 11 March, 2010 12:50:00 PM मुंबई- पवनराजे निंबाळकर हत्या खटल्यातील एका संशयिताला उत्तर प्रदेश पोलिसांनी सीबीआयच्या हवाली करण्यात आला आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येसाठी छोटा पांडे याने शस्त्रे पुरवली असावीत अशा संशयावरून महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली होती. पांडेला सीबीआयच्या हवाली करण्यासाठीच्या प्रक्रियेला एक महिना लागला असून गुरुवारी दुपारी सीबीआयचे अधिकारी त्याला न्यायालयात हजर करणार आहेत. छोटा पांडे हा शार्पशूटर असून खासदार शहाबुद्दीन यांच्याशी त्याची जवळीक असल्याचे म्हटले जाते.