पहिले पान | महामुंबई | गुंडांकडून ग्रामस्थांच्या दुकानांची मोडतोड

गुंडांकडून ग्रामस्थांच्या दुकानांची मोडतोड

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

तहसीलदारांनी काम बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही ‘इनक्रॉप’ कंपनीच्या व्यवस्थापनाने काम सुरू ठेवल्याने संतप्त ग्रामस्थांनी कंपनीचे काम बंद पाडले. त्यानंतर कंपनीच्या गुंडांनी ग्रामस्थांची दुकाने जाळली.

बोईसर- तहसीलदारांनी कंपनी उभारणीचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही इनक्रॉपकंपनीच्या व्यवस्थापनाने ते काम सुरू ठेवल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कंपनीचे काम बंद पाडल्यानंतर कंपनीच्या गुंडांनी ग्रामस्थांची दुकाने जाळल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीला विरोध करणा-या ग्रामस्थांवर दंगलीचे गुन्हे दाखल केल्याचे समजते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

 

वारांगडे-चुरीपाडा येथे गावाच्या मध्यभागी बेकायदा उभारण्यात येणा-या इनक्रॉपकंपनीकडे जाण्यासाठी कोणताही स्वतंत्र रस्ता नसल्याने तसेच  कंपनीमुळे भविष्यात प्रदूषणाचा त्रास होण्याच्या शक्यतेने कंपनी उभारण्यास प्रखर विरोध आह़े त्यासाठी ग्रामस्थांनी गाव बचाव संघर्ष समितीस्थापन केली आहे.

काही दिवसांपूर्वी संघर्ष समितीच्या तक्रारीवर तहसीलदार दिलीप संखे यांनी कंपनीच्या जागी भेट देऊन काम बंद केले होत़े तहसीलदारांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकण्यासाठी बुधवारी एक बैठक बोलावली होती. या प्रकरणी कोणताही निर्णय होईपर्यंत कंपनीचे काम बंद ठेवण्याची सूचनाही त्यांनी कंपनीचे मालक राहुल नौवाल यांना केली होती़ मात्र त्यानंतरही कंपनीने काम सुरू ठेवल्याने संतप्त ग्रामस्थांनी कंपनीचे काम बंद पाडले होते. त्यानंतर कंपनीचे ठेकेदार अफताब कंस्ट्रक्सन आणि कंपनीने जमवलेल्या गुंडांनी गावावर हल्ला चढवला. गुंडांनी ग्रामस्थांच्या दुकानांचीही जाळपोळ केली़

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0