PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: लोअर परळमध्ये आग लोअर परळमध्ये आग ================================================================================ प्रहार वार्ताहर on 12 March, 2010 11:10:00 AM मुंबई- लोअर परळ येथील बावला मशिदीजवळ असलेल्या इराणी चाळीतील एका खोलीला शुक्रवारी सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या चार गाड्या आणि चार पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले होते. ही आग तत्काळ आटोक्यात आल्याचे अग्नीशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले.