पहिले पान | महामुंबई | जेजेत पहिलेवहिले वैद्यकीय संग्रहालय?

जेजेत पहिलेवहिले वैद्यकीय संग्रहालय?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

आशिया खंडातील भायखळा येथील सर्वात जुन्या सर. जे. जे. रुग्णालयाच्या जागेत आता वैद्यकीय संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य शिक्षण विभागाकडे आला आहे.

मुंबई- आशिया खंडातील भायखळा येथील सर्वात जुन्या सर. जे. जे. रुग्णालयाच्या जागेत आता वैद्यकीय संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य शिक्षण विभागाकडे आला आहे. देशातील पहिले-वहिले वैद्यकीय संग्रहालय उभारण्यासाठी आलेला प्रस्ताव अभ्यासल्यानंतर प्रकल्पाला मंजुरी मिळेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी यांनी दिली.

 

या संग्रहालयासाठी ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या आणि जे. जे. रुग्णालयात काम केलेल्या (जे. जे. फ्रेंड्स असोसिएशन) माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने पुढाकार घेतला आहे. १५० वर्षापूर्वी सर. जे. जे. पीरभॉय यांनी ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी जागा दिली होती. त्याच जागेवर सध्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय आहे. भारतातील सर्वात जुन्या अशा जे. जे. रुग्णालयाला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे रुग्णालयातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती तोडून नवीन बांधकाम करण्यास किंवा नव्याने या परिसरात बांधकाम करण्यासही परवानगी नसल्यामुळे हे संग्रहालय कसे आकारास येणार, हा विषय उत्सुकतेचा ठरणार आहे. वैद्यकीय संग्रहालय बांधण्यासाठी अखिल भारतीय युनानी चिकित्सा केंद्राच्या जागेत अंतर्गत दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे समजते.

 

जे. जे. रुग्णालयात होणा-या वैद्यकीय संग्रहालयात आजपर्यंतचा वैद्यकीय आणि सर. जे. जे. पीरभॉय यांचाही इतिहास असेल. संग्रहालयासाठी ऐतिहासिक वारसा जपू शकेल अशा वास्तुशास्त्रज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे युनानी चिकित्सा केंद्र आणि परिचारिकांचे कार्यालय हटवून त्यांचे आरकॉनमध्ये स्थलांतर होणार आहे. या संग्रहालय उभारणीत अडचणीचा ठरणारा भाग म्हणजे येथील सर. जे. जे. मार्ग पोलिस चौकी. संवेदनशील भागात ही चौकी असल्यामुळे काय करावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चौकी इतरत्र हलवल्यास याला राजकीय रंग येईल. म्हणूनच पर्यायी जागेचा शोध सुरू असल्याचेही, गगराणी यांनी स्पष्ट केले. रुग्णालयाच्या आवारातील या पोलिस चौकीत पोलिसांच्या गाडय़ा तसेच वाहतूक विभागाने ओढून आणलेल्या गाडय़ा उभ्या केल्या जातात. त्यामुळे मोकळी जागा शोधावी लागत आहे. सध्या तरी रुग्णालयात मोकळी जागा उपलब्ध नसल्यामुळे या दृष्टीनेही विचार करावा लागणार आहे.

 वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी या प्रस्तावावर चर्चा केली असून लवकरच तोडगा निघेल. देशातील पहिले-वहिले वैद्यकीय संग्रहालय आकाराला आले, तर ती आनंदाचीच गोष्ट आहे, असेही गगराणी यांनी सांगितले.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
5.00