ठाण्यात ‘संकल्प’साठी थरांचा थरार
संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आठ थरांचा थरारक मनोरा रचून मिळवला. तर ठाण्याची मानाची हंडी फोडण्याचा मान मानपाडा येथील अष्टविनायक मित्र मंडळाने मिळवला. महिलांसाठी खास उभारण्यात आलेली दहीहंडी कोपरी येथील शिवतेज महिला मंडळाने फोडली.
ठाणे- महसूलमंत्री नारायण राणे यांच्यासह हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील मांदियाळीच्या साक्षीने साजरा करण्यात आलेल्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आठ थरांचा थरारक मनोरा रचून मिळवला. तर ठाण्याची मानाची हंडी फोडण्याचा मान मानपाडा येथील अष्टविनायक मित्र मंडळाने मिळवला. महिलांसाठी खास उभारण्यात आलेली दहीहंडी कोपरी येथील शिवतेज महिला मंडळाने फोडली. संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक, अभिनेत्री ग्रेसी सिंग यांच्या हस्ते विजयी गोविंदा पथकांना रोख रक्कम, सन्मानचिन्हे देण्यात आली.
रघुनाथनगर येथील रहेजा रोडवर आयोजित संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी ठाण्याच्या औत्सुक्याचा विषय असल्याने सकाळपासून सुरू झालेल्या या उत्सवात प्रचंड गर्दी होती. दुपारी जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, मुग्धा गोडसे, अजिंक्य देव, राहुल वैद्य, ‘स्वाभिमान’चे अध्यक्ष नितेश राणे, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत डावखरे यांनी या उत्सवाला भेट दिल्यानंतर ख-या अर्थाने या उत्सवात रंग भरायला लागले, ते रात्री 11 वाजेपर्यंत, हंडी फुटण्याच्या उत्सहावर्धक क्षणापर्यंत.
दुपारनंतर मुंबईच्या श्रीदत्त मित्रमंडळाने हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच संकल्प महिला मंडळाची मानाची ठाण्याची हंडी कोपरी येथील शिवतेज महिलामंडळाने फोडली. सायंकाळी सात वाजता ताडदेव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आठ थरांची सलामी दिली. त्यानंतर अनेक मंडळी लक्ष्य गाठण्यासाठी सरसावत होते. या दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी उपस्थितांचे मनोरंजन केले.
रात्री पाऊणे नऊच्या सुमारास नारायण राणे यांचे आगमन झाले. जनतेचा उत्साह वाढवण्याचे काम संकल्प प्रतिष्ठान करते. चांगले कार्य करण्यास हे मंडळ कायम तत्पर असते, असे त्यांनी सांगितले.रात्री 9ते 11 हे दोन तास ख-या अर्थाने उत्कंठावर्धक होते. ठाण्याची मानाची सात थरांची हंडी मानपाडा येथील अष्टविनायक मित्र मंडळाने फोडली.
यानंतर ठाण्यातील आठ थरांची सलामी देणा-या आणि त्या फोडणा-या सगळ्या मंडळांना लाखांची बक्षीसे संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक, ग्रेसी सिंग, स्थानिक नगरसेवक शैलेश सावंत, अभिनेता सुशांत शेलार, दीपक वेतकर, रामदास सरोदे, बाळा परब यांच्या हस्ते देण्यात आली.


प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा