पोलिस अधिका-याच्या मुला-सुनेची आत्महत्या
सहाय्यक पोलिस आयुक्त मधुसूदन कुरणे यांच्या मुलाने त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून स्वतःवर आणि पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
मुंबई-मालाड पश्चिम येथे राहणारे सहाय्यक पोलिस आयुक्त मधुसूदन कुरणे यांच्या मुलाने त्यांच्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून स्वतःवर आणि पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सहाय्यक पोलिस आयुक्त मधुसूदन कुरणे यांचा मुलगा अभिजीत (27) याचे पाच महिन्यांपूर्वीच अश्विनी (21) हिच्याशी लग्न झाले होते.
मालाड पश्चिम येथे असलेल्या राजनंदा भागातील रॉयल अपार्टमेंटमध्ये कुरणे राहतात. अभिजीत आणि त्याची पत्नी त्यांच्या खोलीत शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आले. मधुसूदन कुरणे यांच्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून अभिजीतने अश्विनीवर गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांची खोली एसी असल्याने गोळी झाडल्याचा आवाज आला नाही. त्यामुळे ही घटना घडल्याचे घरातल्यांना कळलेच नाही.



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा