PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: नेरुळमध्ये स्कूल बसच्या धडकेत मुलगी ठार नेरुळमध्ये स्कूल बसच्या धडकेत मुलगी ठार ================================================================================ प्रहार वार्ताहर on 03 September, 2010 02:16:00 PM नवी मुंबई- नेरुळमधील सेक्टर क्रमांक 23 मध्ये सेंट ऑगस्टीन शाळेच्या बसने शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास दोन भावंडांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमिन शेख (2) ही जागीच ठार झाली. तिचा भाऊ अब्दुल शेख (7) हा गंभीर जखमी झाला असून त्याला डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरुळ सेक्टर क्रमांक 23 येथील नागेश्वर तलाव परिसरात अमिन आणि अब्दुल दुकानात चालले होती. त्याचवेळेला सेंट ऑगस्टीन शाळेची बसने या दोघांना धडक दिली. यामध्ये अमिन जागीच झाली तर अब्दुल गंभीर झाला. याप्रकरणी बसचालक फारर झाला असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.